भारताच्या या जातीच्या गाईने तोडले जगातील सर्व विक्रम, 40 कोटींमध्ये विक्री, गिनीज बुकात नोंद

Indian Breed Cow: भारतीय जातीची गायीची ब्राझीलमध्ये 40 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. ही गाय आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आढळते. व्हिएटिना-19 नावाच्या गाईने जगभरात ओळख मिळवली आहे. आता तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. पांढरे फर आणि खांद्यावर उंच कुबड्या असलेली ही गाय उंटाप्रमाणे पाणी आणि आहार शरीरात साठवून ठेवते.

| Updated on: Feb 11, 2025 | 7:21 AM
1 / 6
ब्राझीलमधील मिनास गेराइस येथील पशु मेळ्यात एक अनोखी घटना घडली. भारतीय जातीच्या व्हिएटिना-19 या गायीची 40 कोटी रुपयांमध्ये विक्री झाली. हा एक विश्वविक्रम आहे. व्हिएटिना-19 ही नेल्लोर जातीची गाय आहे.

2 / 6
व्हिएटिना-19 नावाची ही गाय दिसण्यास खूपच सुंदर आहे. या गाईमध्ये अनेक विशेषता आहे. या गाईला मिस साउथ अमेरिका हे टाइटल जिंकले होते. त्यानंतर जगभरात या गायीची चर्चा सुरु झाली. जगातील अनेक देशात या गाईच्या वासरांना मागणी वाढली. त्यामुळे तिचा लिलाव झाल्यावर 40 कोटींमध्ये विकली गेली.

3 / 6
गायींच्या नेल्लोर जातीला ओंगोल जाती म्हणूनही ओळखले जाते. या गायींचे वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत कठीण आणि उष्ण परिस्थितीतही जगू शकतात. साधारणपणे उष्ण ठिकाणी गाय कमी दूध देते. पण या गाईवर वातावरणाच्या परिणाम होत नाही. तसेच दूध देण्याच्या क्षमतेवर परिणाम होत नाही.

4 / 6
नेल्लोर जातीच्या गायींची रोगप्रतिकारशक्तीही सर्वात चांगली आहे. सर्व रोगांशी लढण्यास या गाई सक्षम आहेत. यामुळेच तिची लोकप्रियता जगभरात खूप जास्त आहे. 1101 किलो वजनाची ही गाय तिच्या जातीच्या इतर गायींपेक्षा जवळपास दुप्पट वजनाची आहे.

5 / 6
नेल्लोर जातीची गाईची ओळख केवळ तिच्या सौंदर्य आणि मोठ्या आकारापुरती मर्यादित नाही. तिच्या जनुकांमुळे जगभरातील शेतकऱ्यांमध्ये ती लोकप्रिय झाली. तिच्या जनुकांपासून उच्च दर्जाची वासरे तयार करण्यासाठी मागणी वाढत आहे.

6 / 6
नेल्लोर जातीची गाईची विशेष म्हणजे ती उंटांप्रमाणे अन्न आणि पिण्याचे पाणी दीर्घकाळ साठवून ठेवू शकते. यामुळे तिला वाळवंट आणि उष्ण प्रदेशात ठेवणे सोपे झाले आहे. त्यामुळेच नेल्लोर जातीच्या गायींना जगभरात मागणी वाढली आहे.