Ind vs Eng : सामना आणि मालिका जिंकूनही भारताला झटका, सामनाधिकाऱ्यांनी केली मोठी कारवाई!

| Updated on: Mar 22, 2021 | 1:28 PM

1 / 5
 टीम इंडियाने इंग्लंडचा पाचव्या टी 20 सामन्यात पराभव करुन ही मालिका भारताने 3-2 च्या फरकाने जिंकली. मात्र या शानदार मालिका विजयानंतरही भारताला मोठा झटका बसला आहे. या पाचव्या सामन्यात भारताने आवश्यक तो ओव्हर रेट  राखला नाही. यामुळे टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूवर दंडात्मक कारवाई केली आहे.

2 / 5
सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी ही कारवाई केली आहे. एकूण सामन्याच्या मानधनाच्या 40 टक्के रक्कम ही दंड म्हणून आकारण्यात येणार आहे.

3 / 5
क्रिकेटच्या नियमांनुसार ठराविक वेळेत अपेक्षित ओव्हर्सचा खेळ होणं अपेक्षित असतं. मात्र भारताने पाचव्या सामन्यात ठराविक वेळेत 2 ओव्हर कमी टाकल्या. त्यामुळे भारताकडून आयसीसीच्या 2.22 या नियमांचं उल्लंघन झालं.

4 / 5
 या नियमानुसार प्रत्येक ओव्हर मागे 20 टक्के मानधन दंड स्वरुपात आकारण्याची तरतूद आहे. भारताकडून या नियमांचं भंग झाला. भारताने 2 ओव्हर कमी टाकल्या. यामुळे भारताच्या प्रत्येक खेळाडूला 40 टक्के रक्कमेला मुकावे लागणार आहे.

5 / 5
टीम इंडियावर अशा प्रकारची कारवाई करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी दुसऱ्या सामन्यातही विराटसेनेला अपेक्षित षटकगती राखण्यास अपयश आले होते. तेव्हा भारताने 1 ओव्हर कमी फेकली होती. यामुळे भारताला सामन्याच्या मानधनापैकी 20 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आला होता.