
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील शेवटच्या कसोटी सामन्याला उद्या म्हणजेच 7 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी कर्णधार रोहित शर्मा याने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्लेइंग 11 बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एका मॅचवनिर खेळाडूला बाहेर बसावं लागणार आहे.

टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-1 ने विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंड संघाला बेजबॉल स्टाईस पद्धतीचं क्रिकेट काही उपयोगी पडलं नाही. टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी इंग्लंड संघाला पाणी पाजलं.

रोहित शर्मा याने सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना प्लेइंग 11 बाबत माहिती दिली. यावेळी बोलताना, धर्माशालामधील परिस्थिती पाहता तिथे एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संघात घेऊ शकतात.

रोहित शर्मा याच्या वक्तव्याचा विचार केला तर जसप्रीत बुमराह संघात कमबॅक करू शकतो. जर अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला खेळवलं तर एक स्पनिरला बसवावं लागणार. आर. अश्विन आणि जडेजा यांना बाहेर बसवलं जाणार नाही. त्यामुळे कुलदीप यादव याचा पत्ता कट होण्याची जास्त शक्यता आहे.

दरम्यान, पाचवा कसोटी सामना उद्या म्हणजेच 7 मार्चला सकाळी 9. 30 ला सुरू होणार आहे. धर्माशाला येथे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना असणार आहे.