IND vs JAP : श्रेयसला सामनावीर ठरवल्यानं चाहते का नाराज झाले? भारताच्या विजयाच्या खऱ्या शिल्पकाराची एकच चर्चा, नेमका कोण?

भारताच्या विजयाच खरा शिल्पकार श्रेयस अय्यर नाही तर दुसरच खेळाडू असल्याचा सूर चाहत्यांमधून येत होता. पण हा खेळाडू नेमका कोणं हे तुम्हाला माहिती आहे का? त्याची सामन्यातील कामगिरी काय?

| Updated on: Sep 22, 2026 | 5:38 PM
1 / 5
पाऊस आणि टायफूनच्या व्यत्ययामुळे जपानमध्ये भारत आणि जपान यांच्यात अवघ्या 5-5 षटकांचा थरारक टी-20 सामना पाहायला मिळाला. या अटीतटीच्या आणि लो-स्कोरिंग लढतीत भारताने जपानवर केवळ 2 धावांनी निसटता विजय मिळवत कशीबशी आपली लाज राखली.

पाऊस आणि टायफूनच्या व्यत्ययामुळे जपानमध्ये भारत आणि जपान यांच्यात अवघ्या 5-5 षटकांचा थरारक टी-20 सामना पाहायला मिळाला. या अटीतटीच्या आणि लो-स्कोरिंग लढतीत भारताने जपानवर केवळ 2 धावांनी निसटता विजय मिळवत कशीबशी आपली लाज राखली.

2 / 5

आयसीसी क्रमवारीत 33 व्या स्थानी असलेल्या जपानसारख्या नवख्या संघासमोर भारतीय फलंदाजांची कामगिरी मात्र अत्यंत निराशाजनक ठरली. अभिषेक शर्मा (0), संजू सॅमसन (9) आणि ईशान किशन (3) यांसारखे स्टार फलंदाज सपशेल फ्लॉप झाल्याने भारताला 5 षटकांत केवळ 32 धावांपर्यंतच मजल मारता आली.

3 / 5

या पडझडीत कर्णधार श्रेयस अय्यरने 12 चेंडूंत 1 चौकार लगावत 16 धावा केल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याच कामगिरीसाठी त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले. मात्र, या निसटत्या विजयाचा खरा शिल्पकार वॉशिंग्टन सुंदर ठरला.

4 / 5

जपानचा संघ विजयाच्या समीप पोहोचला असताना, दबावाच्या क्षणी सुंदरने 2 षटकांत फक्त 13 धावा देऊन 2 अत्यंत महत्त्वाचे बळी घेतले. धोकादायक ठरत असलेल्या केंडेलला बाद करून त्यानेच खऱ्या अर्थाने सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकवले.

5 / 5

सुंदरच्या या मॅच-विनिंग कामगिरीनंतर श्रेयस अय्यरला सामनावीर निवडल्याने सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप पाहायला मिळत आहे. संपूर्ण संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला असताना 133 च्या स्ट्राईक रेटने 16 धावा करणाऱ्या श्रेयसपेक्षा, जपानच्या तोंडचा घास हिरावून घेणारा वॉशिंग्टन सुंदरच या पुरस्काराचा खरा मानकरी होता, अशीच भावना क्रिकेट वर्तुळात व्यक्त होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us