
बोनी कपूर यांनी मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही देखील बॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसतंय.

बोनी कपूर यांचे काही फोटो सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे बोनी कपूर यांचे बरेच वजन कमी झाल्याचे बघायला मिळतंय.

बोनी कपूर यांनी 68 व्या वर्षी तब्बल 14 किलो वजन हे कमी केले आहे. बोनी कपूर हे वजन कमी केल्यानंतर एकदम फिट दिसत आहेत.

बोनी कपूर यांच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले की, 14 किलो वजन कमी झाले आहे. मात्र, अजूनही 8 किलो वजन कमी होणे शिल्लक आहे.

काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोनी कपूर यांच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले की, आपले मुले आपल्या डाएटकडे लक्ष देत आहेत.