
लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवला आहे. प्रणिती शिंदे यांना त्यांचा भाचा म्हणजेच त्यांच्या बहिणीच्या मुलाने शुभेच्छा दिल्या आहे. प्रणिती शिंदेंचा भाचा आणि अभिनेत्री जान्हवी कपूर दोघे रिलेशनमध्ये असल्याची चर्चा असलेली पाहायला मिळते.

प्रणिती शिंदे यांना मोठा बहिण असून स्मृती शिंदे पहारिया असं त्यांचं नाव आहे. संजय पहारिया यांच्या पत्नी आहेत. स्मृती यांचा शिखर हा सुपुत्र आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार यांचा नातू आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवल्यावर त्यांचा भाचा शिखर पहारिया याने इन्स्टा स्टोरी ठेवत शुभेच्छा दिल्या आहेत. “The people of Solapur have spoken” असं कॅप्शन देत प्रणिती शिंदेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना ईव्हीएममध्ये 74197 मते तर पोस्टल मध्ये 617 मतांची आघाडी होती. तर प्रणिती शिंदे यांना एकूण 6,20,225 मते, भाजपच्या राम सातपुते यांना 5,46,028 मते मिळालीत. प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत.