
काँग्रेस पक्षाची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. हा पक्ष देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून ओळखला जातो. आज काँग्रेसचा 136 वा स्थापना दिवस आहे.

यावेळी मुंबई येथील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

काँग्रेस स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते अपस्थित होते.

काँग्रेस स्थापना दिनानिमित्तान कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने अपस्थित होते.

स्थापना दिनानिमित्त काँग्रेसकडून देशात तसेच जिल्हापातळीवर वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत.