
हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारतीय पासपोर्टचे स्थान सुधारले असून आता भारताची रँक 75 व्या स्थानी आली आहे. आता भारतीय नागरिकांना तब्बल 56 देशात व्हिसा फ्री वा व्हीसा ऑन अरायव्हल सुविधेसह प्रवास करता येणार आहे.

हेनली पासपोर्ट इंडेक्स - हेनली पासपोर्ट इंडेक्स जगातल्या देशांच्या पासपोर्टना त्या देशाचे नागरिक व्हिसा शिवाय किती देशात प्रवेश करु शकतात या आधारे प्रवेश देतो. कोणत्याही देशाची रँक जेवढी चांगली असते, तेवढे त्या नागरिकांची जागतिक सुविधा तेवढी जास्त चांगली मानली जाते.

भारतीय पासपोर्ट धारकांना आता आशिया, आफ्रीका, कॅरेबिय आणि पॅसिफिक क्षेत्रातील अनेक देशात व्हिसा फ्री एण्ट्री मिळणार आहे. यात भूतान, नेपाळ, फिजी, मॉरिशस, थायलँड, इंडोनेशिया, मालदीव आणि श्रीलंकासारख्या देशात मुक्त प्रवेश मिळणार आहे.

भारताची जागतिक ओळख आणि परराष्ट्रीय नितीचा विजयाचे हे चिन्ह आहे. तरीही अनेक देशात भारतीय नागरिकांना व्हिसा शिवाय प्रवेश मिळत नाही. मात्र, तरीही 10 पायऱ्यांनी वरती झेप घेणे कमी नाही.

भारतीय प्रवाशांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे.कारण त्यांना आता अनेक देशात प्रवास, शिक्षण आणि अन्य कारणासाठी जाताना व्हिसा प्रक्रीयेसारख्या सोपस्कारातून सुटका मिळाली आहे. येत्या काही वर्षांत द्विपक्षीय संबंध चांगले मजबूत झाले तर आणखी सुधारणा पाहायला मिळू शकते.