रेल्वे विभागाचा सर्वात मोठा निर्णय, तिकीट बुकिंग सिस्टीमच बदलणार; काय होणार सोपं?

रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्याची रेल्वे तिकीट बुकिंग सिस्टीम ही 1986 साली चालू करण्यात आली होती. गेल्या चार दशकांत यात छोटे-मोठे बदल झालेले आहेत. आता नवी रेल्वे तिकीट बुकिंग सिस्टीम हे आधुनिक, स्मार्ट आणि सुरक्षित असणार आहे.

| Updated on: May 08, 2026 | 9:55 PM
1 / 5
भारतीय रेल्वेने आपली 40 वर्षांपासूनची पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम म्हणजेच पीआरएसला पूर्णपणे अपग्रेड केले आहे. रेल्वे मंत्रालयाने केलेल्या घोषणेनुसार आता येत्या ऑगस्ट 2026 पासून रेल्वे तिकीट बुकिंग सिस्टीम पूर्णपणे हायटेक होणार आहे.

2 / 5

रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्याची रेल्वे तिकीट बुकिंग सिस्टीम ही 1986 साली चालू करण्यात आली होती. गेल्या चार दशकांत यात छोटे-मोठे बदल झालेले आहेत. आता नवी रेल्वे तिकीट बुकिंग सिस्टीम हे आधुनिक, स्मार्ट आणि सुरक्षित असणार आहे.

3 / 5

नव्या बदलानंतर आता वेडिंग लिस्टचे अनुमान लावण्यात सुधारणा होणार आहे. नव्या रेल्वे तिकीट बुकिंग सिस्टीमच्या मदतीने एकाच मिनिटात साधारण दीड लाख तिकीट बुक करता येतील. सध्याच्या तंत्रप्रणालीनुसार मिनिटाला फक्त 32 हजार तिकीट बुक करता येतात.

4 / 5

नव्या तिकीट बुकिंग सिस्टीमचा फायदा तत्काळ तिकीट बुकिंग करतानादेखील होणार आहे. कारण तत्काल तिकीट बुक करताना अनेकदा वेबसाईट हँग होऊन जायची. मात्र आता या नव्या तिकीट बुकिंग प्रणालीनंतर कोणत्याही अडचणीविना तत्काळ तिकीट बुक करता येण्याची शक्यता आहे.

5 / 5

आता रेल्वे विभागाकडून रेलवन अॅपमध्येही लवकरच आणखी सुधारणा केली जाणार आहे. या अॅपला वर्षभरात 3.5 कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आलेले आहे. या अॅपमध्ये तिकीट बुकिंक, रिफंड, तिकीट कॅन्सलेशन, लाईव्ह ट्रेन स्टेटस, प्लॅटफॉर्म डिटेल, रेल मदत असे अनेक ऑप्शन आहेत. या अॅपमध्ये एआयच्या मदतीने वेटिंगलिस्ट कन्फॉर्मेशन प्रेडिक्शनही सांगितले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us