AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट, लाभार्थी शेतकरी मयत झाल्यास वारसांना लाभ मिळणार?

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत राज्यातील 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी वितरीत करण्यात आले. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही रक्कम वितरीत करण्यात आली. त्याचवेळी लाभार्थी शेतकरी मयत झाल्यास त्याच्या वारसांना लाभ मिळतो का, हा प्रश्न अनेकांना सतावत आहे.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट, लाभार्थी शेतकरी मयत झाल्यास वारसांना लाभ मिळणार?
शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेटImage Credit source: आयस्टॉक
| Updated on: Aug 09, 2026 | 3:55 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी राज्यातील 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी शेतकरी कर्जमाफी योजनेत वितरीत करण्यात आले. आता पुढील टप्प्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. अनेक तांत्रिक आणि कागदपत्रातील त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफी योजनेचाल लाभ मिळण्यास उशीर होऊ शकतो. हेअरकटचा मुद्दा सुटला आहे. पण एक अडचण समोर आली आहे. पीक कर्ज घेतलेल्या काही शेतकरी कर्जमाफीच्या निकषात बसतात. पण ते आज हयात नाहीत. त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळेल का?

वारस नोंद केल्यास कर्जमाफीचा फायदा

कर्जमफीच्या निकषात बसणारे पण मयत शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी मयत शेतकऱ्याच्या वारसदाराचे नाव महसुली दप्तरी नोंद करावी. नंतर त्याची पूर्तता सेवा संस्था आणि राष्ट्रीयकृत बँकेत करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. यासंबंधीच्या काही तक्रारी असतील तर शेतकऱ्यांना तालुक्यातील सहाय्यक निंबधक, सहकार खाते यांच्याकडे संपर्क साधता येईल.

कर्जमुक्ती दोन टप्प्यात

पु्ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 7 ऑगस्ट रोजी रक्कम वितरीत करण्यात आली. 5,029 कोटी रुपये, राज्यातील 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. ही पीक कर्ज खाती आता निरंक झाली आहेत. कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी तीन टप्प्यात होणार नाही तर ती दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचे पैसे देण्यात आले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.

आधार प्रमाणिकरण महत्त्वाचे

कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावे लागेल. त्यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही . ॲग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण प्रक्रियेनंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची आणि प्रोत्साहन पर रक्कम जमा होईल. शेतकऱ्यांची कर्जखाती नील होईल. त्यांना नव्याने पीक कर्ज घेता येईल. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल. त्यात प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...