AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांचा धक्कादायक दावा, राजीनाम्यावर खुलासा, थेट म्हटले, दिशाभूल..

नीट पेपरफुटीत मोठे आंदोलन देशभरात बघायला मिळाले. कॉकरोच जनता पार्टीकडून हे आंदोलन करण्यात आले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. राजीनाम्यानंतर आता पहिल्यांदाच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यावर भाष्य केले.

धर्मेंद्र प्रधान यांचा धक्कादायक दावा, राजीनाम्यावर खुलासा, थेट म्हटले, दिशाभूल..
Dharmendra Pradhan
| Updated on: Aug 10, 2026 | 7:56 AM
Share

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांना द्यावा लागला. नीट पेपरफुटीत मोठे आंदोलन देशभरात झाले. कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरू होते. अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात दाखल झाले आणि त्यांनी मोठे आंदोलन देशात उभे केले. विद्यार्थी रस्त्यावर उतरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर मोठा दबाव होता. अखेर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पहिल्यांच मोठे विधान केले. धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, युवा पिढीची दिशाभूल करण्यात आली. देश आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता मी राजीनामा दिला. वरिष्ठ भाजपा नेते आणि संबलपुरचे खासदार धर्मेंद्र प्रधान यांनी भुवनेश्वर येथील जीएम विश्वविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलताना आपल्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया दिली.

धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, काही लोकांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. भारतात दरवर्षी कमीत कमी दोन कोटी लेकरं जन्म घेतात. 10 वर्षात 20 कोटी मुलांनी जन्म घेतला. त्यांच्या काही आकांक्षा आहेत. माझ्यासाठी पद महत्वाचे नाही. यादरम्यान बाहेर बीजेडीच्या कार्यकर्त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावर बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, मी घोषणाबाजीमुळे अजिबात त्रस्त नाही.

मी एका शेतकऱ्याच्या मुलगा आहे. मला परत जाण्यास सांगितले तरीही मी परत जाणार नाही. मी परत येईल. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यावर पहिल्यांदाच भाष्य केले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर मोठा दबाव होता. सरकारने आंदोलकांशी चर्चा करण्याच प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीत.

अखेर सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. धर्मेंद्र प्रधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महत्वाचा चेहरा होते. ओडिसामधील मोठा ओबीसी चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते. विशेष म्हणजे 12 वर्षांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात होते. शेवटपर्यंत त्यांचा राजीनामा होणार नाही, याकरिता सरकारने प्रयत्न केले. पण दबाव वाढल्याने सरकारला राजीनामा घ्यावा लागला.

Follow Us
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर