जनरल डब्यात गर्दी म्हणून दुसऱ्या कोचमध्ये बसलात, आता काही खैर नाही, रेल्वेचा नवा नियम वाचलात का?

रेल्वेच्या सामाना कक्ष किंवा लगेज डब्यातून प्रवास करणे आता महागात पडू शकते. रेल्वे कायद्यानुसार असा प्रवास केल्यास दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते; जाणून घ्या सविस्तर नियम.

| Updated on: Feb 16, 2026 | 3:07 PM
1 / 8
भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अनेकदा जनरल डब्यातील प्रचंड गर्दी टाळण्यासाठी किंवा घाईघाईत प्रवासी रेल्वेच्या सामाना कक्ष म्हणजेच लगेज डब्यात (Luggage Van/Brake Van) शिरतात. मात्र या कोचमधून प्रवास करणे तुम्हाला महागात पडू शकते.

2 / 8
रेल्वेच्या नियमांनुसार सामानाच्या डब्यात बसणे हा केवळ नियमांचा भंग नसून तुमच्या सुरक्षेसाठीही मोठा धोका आहे. रेल्वे कायदा, १९८९ नुसार, रेल्वेच्या अनधिकृत भागात प्रवेश करणे हा दंडनीय गुन्हा आहे. वेगवेगळ्या रेल्वे झोनमध्ये याचे नियम थोडे वेगळे असू शकतात, परंतु कारवाई मात्र केली जाते.

3 / 8
लगेज कोचमधून प्रवास करणाऱ्यांना ५०० ते १,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. तसेच नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्यास ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

4 / 8
दक्षिण पश्चिम रेल्वेच्या नियमांनुसार, सामानाच्या डब्यात प्रवास करताना पकडले गेल्यास AC (फर्स्ट एसी) तिकिटाच्या भाड्याइतका दंड भरावा लागू शकतो. अधिकृत माहितीनुसार, सामानाच्या शुल्काच्या ६ पट किंवा किमान ५० रुपये दंड आकारण्याचीही तरतूद आहे.

5 / 8
रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवाशाने ज्या श्रेणीचे (Class) तिकीट काढले आहे, त्याच कोचमध्ये प्रवास करणे अनिवार्य आहे.  तुमच्याकडे जनरल तिकीट असून तुम्ही स्लीपर किंवा एसी कोचमध्ये चढलात, तर तुम्हाला भाड्यातील फरक आणि अतिरिक्त दंड भरावा लागेल.

6 / 8
जर तुमच्याकडे ३-टायर एसीचे तिकीट असेल आणि तुम्ही २-टायर किंवा फर्स्ट एसीमध्ये प्रवास करत असाल, तर भाड्याचा फरक आणि शुल्क आकारले जाते. महिलांसाठी राखीव डबे, दिव्यांग कोच किंवा विशेष राखीव डब्यांमध्ये पात्रता नसताना प्रवास करु नये.

7 / 8
अशाप्रकारे जर तुम्ही प्रवास केल्यास रेल्वे कर्मचारी त्वरित कारवाई करून तुम्हाला पुढील स्टेशनवर उतरवू शकतात. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जाते की, सामानाचा डबा हा केवळ वस्तू ठेवण्यासाठी बनवला आहे, प्रवाशांच्या बसण्यासाठी नाही.

8 / 8
पण अनेकदा प्लॅटफॉर्मवर गाडी सुटताना होणारी घाई किंवा कोच नंबर माहित नसल्यामुळे प्रवासी सामानाच्या डब्यात चढतात, जे अपघाताला निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे नेहमी आपल्या नियोजित कोचमधूनच प्रवास करावा.