भारतीय रेल्वेचे ‘SwaRail’ अ‍ॅप खूप येईल कामी, कोट्यवधी प्रवाशांना त्याचा मोठा फायदा होईल

स्वरेल अ‍ॅप डाऊनलोड: ट्रेनची तिकिटे बुक करण्यापासून ते पीएनआर स्टेटस तपासण्यापर्यंत या कामांसाठी आता तुम्हाला एकच रेल्वे एप कामी येणार आहे. भारतीय रेल्वने हे सुपर एप लाँच केले आहे, या अॅपचा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे.

| Edited By: | Updated on: Feb 09, 2025 | 12:22 AM
1 / 6
आता तुम्हाला रेल्वे संबंधीच्या सेवांसाठी स्मार्ट फोनवर विविध  एप डाऊनलोड करण्याची काही आवश्यकता नाही. या सेवांसाठी प्रवाशांना विविध अॅप्सचा आधार करावा लागत आहे, आता भारतीय रेल्वेने एक सुपर अॅप लाँच केले आहे, त्याचे नाव स्वरेल एप असे आहे.

2 / 6
रेल्वे तिकिटे बुक करण्यापासून ते जेवण ऑर्डर करण्यापर्यंत, प्रवाशांना विविध सेवांसाठी त्यांच्या फोनवर वेगवेगळे अॅप्स डाऊनलोड करावे लागत होते. परंतु आता सरकारने लोकांची ही समस्या दूर केली आहे.  भारतीय रेल्वेचे नवीन सुपर  'SwaRail' App लाँच केले आहे.  भारतीय रेल्वेचे हे सुपर अॅप CRIS (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम) ने विकसित केले आहे.

3 / 6
 'SwaRail' App  वैशिष्ट्ये: भारतीय रेल्वेचे हे सुपर अॅप लाँच केल्याने आता रेल्वे संबंधीच्या सर्व सेवा या एकाच एपवर मिळणार आहेत.त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

4 / 6
 या सुपर अॅपच्या मदतीने, तुम्ही ट्रेन तिकीटांचे बुकिंग करु शकता, अनारक्षित तिकीट बुकिंग, पार्सल सेवेची माहिती, प्लॅटफॉर्म तिकिटांची खरेदी, ट्रेनचे टाईम टेबल आणि सद्यस्थिती, तिकीटांच्या पीएनआर स्थिती, ट्रेनमधील जेवणाची ऑर्डर आणि तक्रार अशा सर्व सेवा या एकाच अॅपद्वारे मिळणार आहेत.

5 / 6
SwaRail' App कसे वापरावे: हे अ‍ॅप सध्या बीटा चाचणीच्या टप्प्यात आहे आणि लवकरच ते लोकांसाठी उपलब्ध होईल. तुम्ही हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर, तुम्ही नवीन वापरकर्ता म्हणून साईन इन करू शकता किंवा तुमचे विद्यमान रेल कनेक्ट किंवा यूटीएस मोबाइल आयडीचा तपशील लोड करू शकता.

6 / 6
  हे सुपर अॅप आणण्यामागे सरकारचा एकच उद्देश आहे आणि तो म्हणजे प्रवाशांना रेल्वेच्या सर्व सेवा एकाच एपवर मिळाव्यात त्यांना या सेवांसाठी एका अॅपवरून दुसऱ्या अॅपवर जावे लागू नये यासाठी 'SwaRail' App आणले आहे.