
जर तुम्हाला कोणी सांगितले की भारताचे 20 हजार रुपये कोणा देशात जाऊन करोडो रुपयांत बदलू शकतात तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाहीत.

इराणमध्ये भारतीय रुपयांची किंमत करोडोत आहे. तेथे आपले 20 हजार रुपये 9.5 कोटी रियालच्या बरोबर आहेत. परंतू तेथील महागाई देखील तेवढी जास्त आहे. परंतू शिक्षण आणि नोकरीसाठी फायदा होतो.

इराणचे चलन रियाल (Iranian Rial) भारतीय रुपयाच्या तुलनेत कमजोर आहे. जेव्हा कोणताही भारतीय तेथे रुपये एक्स्चेंज करतो तेव्हा त्यास करोडो रियाल मिळतात.

1 भारतीय रुपया = 475.58 इराणी रियाल असा हिशेब आहे. जर तुमच्याकडे 20,000 रुपये आहेत. तर इराणमध्ये ही रक्कम 9 कोटी 51 लाख 16 हजार रियाल (9,51,16,000 Rial) च्या बराबर होते. हे ऐकायला खूप धक्कादायक वाटेल. परंतू सत्य आहे.

इराण एकेकाळी तेल संपन्न आणि मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश होता. परंतू अमेरिकेचे आणि अन्य देशांचे निर्बंध, तेल निर्यातीवर बंदी आणि राजकीय अस्थैर्य यामुळे चलन कमजोर झाले. आज एका अमेरिकन डॉलरची किंमत 47,000 रियाल पर्यंत पोहचली आहे.

इराणमधील एका विद्यापीठे उदा.University of Tehran, Sharif University of Technology आणि Amirkabir University आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जातात. भारतीय विद्यार्थी येथे इंजिनिअरिंग, सायन्स, मेडिकल आणि आर्ट्स सारखे कोर्स स्वस्तात शिकतात.

येथील रेस्टॉरंटमध्ये साधे जेवण 5 ते 6 लाख रियाल इतके महाग आहे. तर विदेशी वस्तू आणि ब्रँडेड सामान प्रचंड महाग आहे. यामुळे येथे जाऊन तुम्ही करोडपती तर होऊ शकता. परंतू खर्चही करोडोत करावा लागेल.

भले रुपया येथे करोडोत बदलला जात असला तरी येथील रहाणीमान स्वस्त नाही. एक कफ कॉफीसाठी तुम्हाला 1,00,000 रियाल लागू शकतात.