Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचं कसं ठरलं लग्न ?

इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचे साहिल चिलपसोबत अहिल्यानगरात थाटामाटात लग्न झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेकांची उपस्थिती होती. ज्ञानेश्वरीने MC DCCS, तर साहिलने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. महाराजांनी स्वतः पाहुण्यांची व्यवस्था पाहिली. अहिल्यानगरात झालेल्या या लग्नाला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यापासून अनेक राजकारण्यांसह लाखो लोकांनी हजेरी लावली.

| Updated on: May 05, 2026 | 12:44 PM
1 / 7
विख्यात कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या लाडक्या मुलीचं ज्ञानेश्वरीचं लग्न, रविवार 3 मे रोजी थाटामाटात पार पडलं. अहिल्यानगरात  झालेल्या या लग्नाला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यापासून अनेक राजकारण्यांसह लाखो लोकांनी हजेरी लावली. संध्याकाळी लग्नात चमचमीत जेवणाचा बेतही होता. वऱ्हाडींच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची चोख व्यवस्था आहे ना, यावर इंदोरीकर महाराजांनी जातीने लक्ष ठेवलं होतं. अनेकांनी लग्नाला उपस्थित राहून वधू-वरांना भावी आयुष्यासाठी आशिर्वाद दिले. ( All Photos : Social Media)

2 / 7
इंदोरीकर महाराज नेहमी चर्चेत असतात, त्यांचं कीर्तनही लोक आवडीने ऐकत असता. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचीही लोकांना खूप उत्सुकता असते. त्यामुळेच त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला तेव्हा खूपच चर्चा झाली. तशीच चर्चा लग्नाच्या वेळेसही झाली. त्यांच्या घरी कोण, मुलगी, जावई काय शिकले,  असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात होते. सोशल मीड्यावरही इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाचे व्हिडीओ, फोटो खूप व्हायरल झाले. तसेच इंदोरीकर महाराजांची मुलगी, आणि जावई साहिल याचं लग्न कसं जमलं हे जाणून घेण्यासही लोक उत्सुक होते.

3 / 7
ज्ञानेश्वरी आणि साहिल यांच्या लग्नाची लग्नपत्रिका खूप व्हायरल झाली, पण या लग्नपत्रिकेत दोघांच्याही शिक्षणाची माहिती नव्हती. त्यामुळे इंदोरीकरांची लाडकी मुलगी किती शिकली आणि जावयाचं शिक्षण किती असा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत होता. त्यांचा जावई कोण, कुठला, किती शकिला, हेही लोकांना जाणून घ्यायचं होत.

4 / 7
इंदोरीकर महाराजांचे जावई, साहिल चिलप मुळचे नवी मुंबईचे असून त्यांनी  इंजीनिअरिंगचं शिक्षण गेल्यावर्षीच पूर्ण केलं. तर इंदोरीकर महारजांची कन्या, ज्ञानेश्वरी  हिनेही 	एमसी डीसीएसचं शिक्षण पूर्ण केलं.

5 / 7
गेल्यावर्षी दोघेही शिक्षण घेत असतानाच कुटुंबाने लग्नाचा निर्णय घेतला. साहिल आणि ज्ञानेश्वरी दोघेही आईवडिलांच्या शब्दाच्या बाहेर नव्हते, त्यामुळे लग्नाचा प्रस्ताव आल्यावर,  त्यांनीही या लग्नाला संमती दर्शवली. दोघांनीही साखरपुड्यासाठी होकार दिला.

6 / 7
विशेष म्हणजे लग्न ठरवण्याची बैठक बसली तेव्हा इंदोरीकर महाराज यांनी मार्मिक विधान केलं होतं. "आम्ही तुमची संपत्ती पाहिली नाही, आम्ही माणसं पाहिली", असं इंदोरीकर महाराज लग्न जुळवताना म्हणाले होते.

7 / 7
लेकीच्या लग्नात स्वत: इंदोरीकर महाराज जातीने प्रत्येक तयारीवर लक्ष ठवून होते, हळदी समारंभानंतर तर त्यांनी स्वत: पाहुण्यांना जेवण वाढलं होतं. कुणाला काही कमी तर पडत नाही ना याची त्यांनी स्वत: जातीने दखल घेतली,  प्रत्येकाशी आत्मियतेने संवाद साधला.

Follow Us