54 वर्षांपूर्वीचा बंगला… धर्मेंद्र-हेमा मालिनींच्या आठवणींनी भरलेला, आतुन पाहिलात का?
सध्या सोशल मीडियावर दिवंगत अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या घराचे फोटो व्हायरल झाले आहेत. धर्मेंद्र यांनी हे घर कसे सजवले होते तुम्ही पाहिलेत का? एकदा पाहा...

बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांचे मुंबईतील ५४ वर्ष जुने भव्य घर आहे. हे घर अभिनेत्रीने धर्मेंद्र यांच्या आठवणींनी सजवले आहे. ईशा देओलने आपल्या आईच्या या ड्रीम होमचा लूक दाखवला आहे. घराच्या आतल्या भागाचे दर्शन घेतल्यावर फॅन्स चकीत झाले आहेत. हेमा मालिनींचे घर आतून अत्यंत क्लासिक आणि आलिशान दिसते. त्यांच्या घराच्या भिंती धर्मेंद्र यांच्या छायाचित्रांनी सजलेल्या आहेत.

हेमा मालिनींचे हे घर सुमारे ५४ वर्ष जुने आहे, ज्याचे रेनोव्हेशन करून त्याला अनेक मजली बंगल्यात रूपांतरित करण्यात आले आहे. या घराचे नाव ‘अद्वितीय’ आहे. ईशा यांनी सांगितले की, पूर्वी या घराला कोणतेही नाव नव्हते, पण नंतर आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी ‘अद्वितीय’ नाव ठेवण्याचा सल्ला दिला. या शब्दाचा अर्थ ‘सर्वात वेगळे’ किंवा ‘ज्याची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही’ असा आहे.

हेमा मालिनींच्या घरातील लिव्हिंग आणि डायनिंग एरियात मोठ-मोठ्या खिडक्या आहेत. ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आत येतो. यामुळे संपूर्ण घर खुला, हवेशीर आणि अत्यंत शांत वाटते. घरात क्रिम रंगाचे आरामदायक सोफे आणि सुंदर आर्मचेअर्स आहेत. हे घर फार विचारपूर्वक आणि कल्पकतेने सजवले गेले आहे.

डान्स रिहर्सल रूममध्ये धर्मेंद्र यांची मोठी छायाचित्र लावले आहे, ज्यात ते हसताना दिसत आहेत. वडिलांबद्दल बोलताना ईशा भावूक झाली आहे. या रूममध्ये लाकडी फ्लोअरिंग करण्यात आली आहे.

दुसरीकडे, ऑफिस रूममध्ये हेमा मालिनी यांचे पती आणि मुलींसोबत अनेक छायाचित्रे लावलेली आहेत. या रूममध्ये एक पेंटिंगही आहे, ज्यात धर्मेंद्र आणि हेमा यांची छायाचित्र धाग्यां (थ्रेड) ने बनवलेली दिसते. ऑफिस रूममध्ये हेमा आणि धर्मेंद्र यांची अनेक छायाचित्रे लावलेली आहेत, त्यापैकी काही छायाचित्रे आणि पेंटिंग्स फॅन्सनी भेट म्हणून दिलेल्या आहेत.

हेमा मालिनींच्या मोठ्या बंगल्यात एक मोठे खोली आहे, ज्यात दोन सोफे ठेवलेले आहेत. या दोन्ही सोफ्यांनी प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले आहे. या सोफ्यांवर ठेवलेल्या कुशनवर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या छायाचित्रांचे प्रिंट आहेत. हे कुशन कोणीतरी गिफ्ट केले होते.

ईशा देओल यांनी सांगितले की, या तीन मजली बंगल्यात प्रत्येकासाठी वेगळे मजले आहेत. तिचा आणि अहानाचा मजला यांचे इंटिरियर देखील वेगळे आहे. अभिनेत्रीने सांगितले की तिला साऊथ इंडियन जेवण खूप आवडते.