
इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनातून नेहमी लोकांना सांगतात की लग्न हे साधेपणाने, दिखाव्याविना करायचे. पण जेव्हा त्यांच्या लेकीचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या. इंदूरीकर महाराजांनी मोठ्या थाटामाटात मुलीचा साखरपुडा केला. दरम्यान, इंदुरीकर महाराजांच्या वैयक्तीक आयुष्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांचे घर कसे आहे हे देखील समोर आले आहे.

इंदुरीकर महाराजांचे निवासस्थान हे संस्कृती आणि कलेचा संगम असल्याचे जाणवते. निवासस्थानाला लाकडी प्रवेशद्वार आहे. ते दररोज फुलांनी सजवले जाते असे म्हटले जाते.

इंदुरीकर महाराजांच्या निवासस्थानात एण्ट्री केल्यानंतर पहिले एक लिविंग एरिया आहे. तेथे बसण्यासाठी सोफा तयार करण्यात आला आहे. हा सोफा लाकडाच्या रंगाचा आहे. तो आकर्षक दिसत आहे.

त्यानंतर घरात एण्ट्री करताच उजव्या बाजूची पूर्ण भींत पुरस्कार ठेवण्यासाठी करण्यात आली आहे. इंदुरीकर महाराजांना आतापर्यंत मिळालेले सर्व पुरस्कार तेथे ठेवण्यात आले आहेत. ही संपूर्ण भींत सर्वांचे लक्ष वेधून घेते.

याच भागात एक मोठे आसन ठेवण्य़ात आले आहे. हे आसन इंदूरीकर महाराजांच्या बसण्याचे आसन असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या हॉलमध्ये एक टीव्ही यूनिट देखील दिसत आहे.

त्यानंतर इंदूरीकर महाराजांच्या घरात पुढे गेल्यानंतर एक छोटेसे देवघर दिसते. हे देवघर फुलांनी सजवलेले दिसत आहे. तसेच त्या देवघराच्या शेजारी विठ्ठल-रखुमाईची मूर्ती दिसत आहे.

इंदूरीकर महाराजांचे घर हे दोन मजल्याचे आहे. दुसऱ्या मजल्यावर देखील सुंदर आणि आकर्षक फर्निचर करण्यात आले आहे.

इंदूरीकर महाराजांच्या घरात एक बेडरुम देखीस आलिशान आहे. कपाटे, टीव्ही आणि बेड असलेला हा बेडरुन आकर्षक दिसत आहेत. पण हा बेडरुम कोणाचा आहे हे अद्याप समोर आलेले नाही,.