
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. नेहामुळे कथानकात ट्विस्ट येताना दिसत आहेत. सीताईच्या दडपणाखाली आणि शिवाच्या आव्हानामुळे चिडलेल्या आशूने अखेर नेहाशी लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे.

नेहा शिवाला सांगते की आशूने लग्नाला होकार दिला आहे. यामुळे शिवाला खूप आनंद झालाय. आशूच्या मनात तिच्याविषयीच्या भावना वाढतील, अशी शिवाला अपेक्षा आहे. शिवा सगळ्यांना सांगते की आशूची चांगल्याप्रकारे काळजी घ्या.

दुसरीकडे दिव्या ही शिवा आणि नेहाला एकत्र बोलताना पाहते. नेहा आशूसमोर शिवाच्या हावभावांची नक्कल करते, ज्यामुळे आशूच्या मनात शिवाचा विचार अधिकच पक्का होतो. आशूच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.

दरम्यान, शिवा आणि आशू एका आजारी महिलेला वाचवण्यासाठी एकत्र येतात. या घटनेमुळे आशूला शिवाच्या प्रामाणिकतेवर विश्वास बसतो. याआधी आशू आणि शिवा कंपनीच्या बोर्ड मीटिंगसाठी म्हणून एकत्र येतात, त्यात शिवाचा मुद्दा भाऊ उचलून धरतात. पण आशूला हे पटत नाही.

आशू आणि शिवामध्ये या कारणावरून कडाक्याच भांडण होतं. नेहा मधे पडून त्यांचं भांडण मिटवायच्या प्रयत्न करते. पण लॉबीमधे सगळे कामगार शिवाच्या बाजूने उभे राहतात. आशूची चिडचिड होतेय आणि याचाच किर्ती आणि सीताई फायदा घेतात.

नेहाला काही करून आशू आणि शिवाचं भांडण मिटवायचं आहे. हे सर्व सुरु असताना पाना गँग, मांजा आणि संपदा मिळून शिवाला एक सरप्राईज द्यायचं ठरवतात. सगळे मिळून मकरसंक्रांतीचा सण आणि पतंगोत्सव जल्लोषात साजरा करायचा निर्णय घेतात.