
जगभरात उत्सुकता निर्माण केलेल्या Apple कंपनीच्या ९ सप्टेंबर रोजी iPhone 17 हा नवीन फोन लाँच केला. या सीरिजमध्ये अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. या सीरिजमध्ये अनेक मॉडेल्ससह कंपनीचा सर्वात पातळ फोन iPhone Air देखील लॉन्च केला.

iPhone 17 Pro Max या फोनची सर्वाधिक क्रेझ पाहायला मिळत आहे. भारतात याची किंमत साधारण दीड ते दोन लाखांच्या आसपास आहे. पण हाच फोन पाकिस्तानात कितीला मिळतो, याबद्दल आपण जाणून घेऊया.

पाकिस्तानमध्ये, बेस मॉडेलची (२५६ जीबी) अंदाजित किंमत ५,२५,००० ते ५,७५,००० पाकिस्तानी रुपये इतकी आहे. याच्या टॉप व्हेरिएंट्ससाठी (५१२ जीबी, १ टीबी) अंदाजे किंमत ५,७५,००० ते ६,६०,००० पाकिस्तानी रुपये इतकी आहे.

काही विक्रेते २५६ जीबी मॉडेलच्या फोनची किंमत ५,७३,९९९ पाकिस्तानी रुपये इतकी आहे. भारतात iPhone 17 Pro Max च्या बेस मॉडेलची (२५६ जीबी) किंमत १,४९,९०० पासून सुरू होत आहे.

भारताता ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत सुमारे १,६९,९०० आहे. १ टीबी आणि २ टीबी सारख्या टॉप व्हेरिएंट्सची किंमत यापेक्षा जास्त आहे. साधारण ₹ १,८९,९०० ते ₹ २,२९,९०० पर्यंत हे टॉप व्हेरिएंट आहेत.

भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये या फोनची किंमत खूप जास्त आहे. यामागे अनेक कारणे आहेत. पाकिस्तानमध्ये फोनवर आयात कर (Import Tax), कस्टम ड्यूटी आणि पीटीए (PTA) टॅक्स इत्यादी खूप जास्त प्रमाणात लावले जातात.

पाकिस्तानी रुपयाची किंमत USD डॉलरमध्ये भारताच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे किंमतींमध्ये मोठी वाढ होते. स्थानिक वितरण (Local Distribution), विक्रेत्यांचे मार्जिन आणि लॉजिस्टिक (Logistic) या खर्चामुळेही किंमत वाढते.

भारतात iPhone 17 Pro Max ची किंमत पाकिस्तानच्या तुलनेत खूपच कमी आहे. पाकिस्तानमध्ये बेस मॉडेलची किंमत सुमारे ५,२५,००० ते ५,७५,००० असताना भारतात त्याच व्हेरिएंटची किंमत १,४९,९०० रुपये इतकी आहे.