
आयपीएलच्या 14 व्या पर्वात आजपासून डबल हेडर सामन्यांना सुरुवात झाली आहे. या डबल हेडरमधील दुसरा सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. या सामन्यात विकेटकीपर कर्णधार रिषभ पंत आणि केएल राहुल यांच्यातही कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्यात 4 खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरणार आहे.

उभयसंघ आतापर्यंत एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये पंजाब वरचढ राहिली आहे. पंजाबने दिल्लीवर 15 वेळा विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 11 वेळा पंजाबवर मात केली आहे.

भारतात हे दोन्ही संघांचा एकूण 22 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये 9 वेळा दिल्लीने विजय मिळवला आहे. तर 13 वेळा पंजाबने दिल्लीचा धुव्वा उडवला आहे.

दिल्ली विरुद्ध पंजाबचा कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 137 धावा केल्या आहेत. तसेच मोहम्मद शमीने 8 विकेट्स पटकावल्या आहेत.

तसेच पंजाब विरुद्ध दिल्लीचा 'गब्बर' शिखर धवनने सर्वाधिक 200 धावा केल्या आहेत. तर अमित मिश्राने 10 विकेट्स मिळवल्या आहेत.