
आरसीबीच्या वैशाक विजयकुमारनं बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चमकदार कामगिरी करत एका विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यातच तो हिरो ठरला आहे. (Photo : Twitter)

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकाच्या जोरावर 6 गडी गमवून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अडखळत झाली. (Photo : Twitter)

सलामीला आलेला पृथ्वी शॉ धावचीत झाला. त्यानंतर मिशेल मार्श आमि यश धुल स्वस्तात तंबूत परतले. मात्र मैदानात असलेल्या डेव्हिड वॉर्नरची विकेट आरसीबीसाठी महत्त्वाची होती. (Photo : Twitter)

आयपीएलमध्ये पहिलं षटक टाकणाऱ्या वैशाकने चौथ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरची विकेट काढली. त्यानंतरच्या षटकात फॉर्मात असलेल्या अक्षर पटेल आणि ललित यादव यांना तंबूचा रस्ता दाखवला. (Photo : Twitter)

पहिल्याच सामन्यात वैशाक विजयकुमारने 4 षटकं टाकतं 20 धावा आणि तीन गडी बाद केले. पदापर्णातच आरसीबीसाठी त्याने ही कामगिरी केली. आता आगामी सामन्यासाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे. (Photo : Twitter)