
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून राहुल त्रिपाठी आहे. राहुल याने आयपीएलमधील तीन फायनल खेळल्या आहेत. मात्र तो ज्या संघाकडून खेळलाय त्या संघाला विजय मिळवता आलेला नाही.

2017 मध्ये रायजिंग पुणे सुपर जायंट्स या संघाकडून तो खेळत होता. महेंद्र सिंह धोनीकडे तेव्हा पुण्याच्या संघाची धुरा देण्यात आलेली. पुण्याचा संघाने अंतिम फेरी गाठली. मात्र मुंबईने त्यांचा पराभव करत हा सामना जिंकला होता

2021 मध्ये केकेआर आणि चेन्नईमध्ये आयपीएल फायनल झाली होती. तेव्हा राहुल केकेआर संघाकडून खेळत होता, मात्र केकेआरचा त्यावेळी पराभव झाला होता.

यंदाच्या वर्षी तिसरी राहुल त्रिपाठीने तिसरी आयपीएल फायनल खेळली. सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळणाऱ्या राहुलकडून टीमला अपेक्षा होत्या. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. केकेआरन दहा वर्षांनी विजेतेपदावर नाव कोरलं.

राहुल त्रिपाठी याने यंदाच्या मोसमामध्ये 6 सामन्यात 165 धावा त्याने केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश असून सर्वाधिक धावसंख्या 55 आहे IPL मध्ये राहुल याने 95 सामने खेळताना 2236 धावा केल्या आहेत. यामध्ये 12 अर्धशतकांचा समावेश असून त्याला एकही शतक झळकवता आलेलं नाही.