
आयपीएल 2025 स्पर्धेचं जेतेपद कोण मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जात आहे.

पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे फलदांजी करत आहेत. यंदाच्या आयपीएलची खास बाब म्हणजे पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्हीही संघ पहिल्यांदाच अंतिम सामना खेळत आहेत.

आयपीएल 2025 स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला रोख बक्षीस आणि त्यासोबतच ट्रॉफी दिली जाते. ही ट्रॉफी उंचावणं अनेकांचं स्वप्न असतं.

जर तुम्ही आयपीएलची ट्रॉफी पहिली तर तुम्हाला कळेल की या ट्रॉफीवर बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. सोनेरी रंगात सजलेली ही ट्रॉफी डोळ्यांचं पारणं फेडणारी असते.

आयपीएल ट्रॉफीच्या समोरच्या बाजूला संस्कृत भाषेत एक श्लोक लिहिलेला असतो. हा श्लोक 'यात्रा प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि' असा आहे.

याचा अर्थ इंग्रजी भाषेत 'Where talent meets opportunity' असा होतो.

ट्रॉफीवर लिहिलेल्या 'यात्रा प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि' श्लोकाचा अर्थ म्हणजे 'जिथे प्रतिभेला संधी मिळते' असा होतो.

संस्कृत श्लोक वगळता आयपीएलच्या ट्रॉफीवर यापूर्वीच्या विजेत्या संघांची नावं लिहिलेली असतात. तसेच त्यांनी कोणत्या वर्षी ही स्पर्धा जिंकली याबद्दलही लिहिलेले असते.

आयपीएल ट्रॉफी ही चांदी, अॅल्युमिनियम आणि इतर धातूंचा वापर करून तयार केली जाते. या ट्रॉफीला शुद्ध सोन्याची पॉलिश केली जाते, ज्यामुळे ती अधिक आकर्षक आणि चकचकीत दिसते.

आयपीएल ट्रॉफीचं वजन हे साधारणपणे 6 किलो असतं आणि तिची उंची 26 इंच इतकी असते. आयपीएल ट्रॉफीची नेमकी किंमत अधिकृतरीत्या कधीच जाहीर करण्यात आलेली नाही. पण अनेक रिपोर्ट्सनुसार या ट्रॉफीची किंमत 30 लाख ते 50 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.

इंडियन प्रीमियर लीगची आकर्षक ट्रॉफी 2008 पासून भारतातील प्रसिद्ध दागिन्यांच्या ब्रँड ORRA कडून बनवली जाते.