IPL Playoff Scenario : प्लेऑफमध्ये एका स्थानासाठी चार टीममध्ये काँटे की टक्कर, मुंबई इंडियन्सच्या हातात तीन टीम्सचं भविष्य

IPL 2026 Playoff Scenario : कालच्या सामन्याच गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. या विजयासह गुजरातने प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. चेन्नई सुपर किंग्सच या मोसमातील आव्हान संपुष्टात आलय. आता आयपीएल प्लेऑफचा प्रवास रंजक झाला आहे. एक स्थानासाठी चार टीममध्ये चुरस आहे.

| Updated on: May 22, 2026 | 9:20 AM
1 / 5
  आयपीएल प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 13 सामन्यात 18 पॉइंटसह टॉपवर आहे. गुजरात टायटन्स 13 सामन्यात 18 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. सनरायजर्स हैदराबादचे 13 सामन्यात 16 पॉइंट्स आहेत. या तीन टीम्सनी प्लेऑफमधील आपलं स्थान आधीच निश्चित केलं आहे.

2 / 5
आता प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानासाठी चार टीम्समध्ये चुरस आहे. राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स. या चारही टीम्सना प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर आपला शेवटचा सामना जिंकावाच लागेल. त्यातही काही टीम्सना दुसऱ्या सामन्यांच्या निकालावर अवलंबून रहावं लागेल.

3 / 5
 राजस्थान रॉयल्सचे 13 सामन्यात 14 पॉइंट्स आहेत. पंजाब किंग्सचे 13 सामन्यात 13 पॉइंट्स आहेत.कोलकाता नाईट रायडर्सचे 13 सामन्यात 13 पॉइंट्स आहेत. दिल्लीचे 13 सामन्यात 12 पॉइंट्स आहेत.  दिल्ली आणि केकेआरचा शेवटचा सामना परस्पराविरुद्धच आहे. त्यामुळे दोघांपैकी कुठली तरी एक टीम बाहेर जाणार हे निश्चित आहे.

4 / 5
पंजाबच शेवटचा सामना LSG विरुद्ध आहेत. त्यांना ही मॅच जिंकावीच लागेल, तर त्यांचे 15 पॉइंट्स होती. लखनऊला फरक पडणार नाही. ते आधीच बाहेर गेलेत. 14 पॉइंटवर असलेल्या राजस्थान रॉयल्सचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध आहे.

5 / 5
 रविवारी ही मॅच होईल. हा सामना राजस्थानने जिंकला, तर ते थेट प्लेऑफसाठी पात्र ठरतील. पण ते हरले, तर अन्य तीन टीम्सना संधी मिळेल. त्यामुळे मुंबईच्या हाती कोलकता, पंजाब आणि दिल्ली यांचं भविष्य आहे असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही.

Follow Us