
यंदाच्या आयपीएलमध्ये मोठे फेरबदल होताना दिसणार आहेत. अनेक संघांनी आपल्या प्रमुख खेळाडूंनाही रिलीज केलं आहे. त्यामुळे लिलावात मजा येणार आहे, यामध्ये कोणत्या संघाची मॅनेजमेंट यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळडूंच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या रचिन रवींद्रसाठी मोठी संधी आहे. रचिन रवींद्रने 10 मॅचमध्ये 578 धावा केलेल्या. यामध्ये त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके केली होतीत. त्यासोबतच बॉलिंग करतानाही 5 विकेट घेतल्या होत्या. शानदार कामगिरीमुळे लिलावामध्ये त्याच्यावर पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दुसरा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिका संघाचा गेराल्ड कोएत्झी, पठ्ठ्यने सेमी फायनलमध्ये एकट्याने एखाद्या योद्ध्यासारखी ऑस्ट्रेलियाला टसल दिली. 8 सामन्यात 19.80 च्या सरासरीने आणि 6.23 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 20 विकेट्स घेतल्या. त्यामुळे फ्रँचायझींचा या खेळाडूवरही डोळा असणार आहे.

तिसरा खेळाडू म्हणजे ज्यामुळे ट्रॅव्हिस हेड हा असून ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याचा सिंहाचा वाट होता. सेमी फायलनल आणि फायनल सामन्यामध्ये महत्त्वाची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. हेडने प्रभावशाली गोलंदाजी करत सर्वांना प्रभावित केलं होतं. त्यामुळे यंदाच्या लिलावामध्ये त्याच्यावरही पैशांचा पाऊस पडू शकतो.

चौथा खेळाडू भारतीय असून तो वर्ल्ड कपमध्ये नसला तरी त्याच्याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. पंजाबने त्याला रिलीज केलं आहे. स्फोटक खेळाडूवरही सर्वांची नजर असणार असून मागील आयपीएलमध्ये त्याने आपली ताकद दाखवून दिली आहे.