America Election : ट्रम्प निवडणूक हारताच इराणकडून मोठी धमकी, आता युद्धात आरपारची लढाई, टेन्शन वाढलं!

या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने आता जागतिक राजकारणावर परिणाम करणारे तसेच इतर कोणतेही धोरण ठरवताना ट्रम्प यांना विरोधकांचा सामना करावा लागेल. असे असतानाच खामेनेई यांनी अमेरिका- इराण युद्धावर महत्त्वाचे भाष्य केलेय.

| Updated on: Nov 05, 2026 | 2:40 PM
1 / 5
अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत तेथील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का बसलाय. त्यांच्या रिपब्लिकन पक्षाविरोधात लोकांनी भरभरून मतदान केले असून त्यांच्या पक्षाचा पराभव झालाय. असे असतानाच आता इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी प्रतिक्रिया दिलीय.

2 / 5

या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने आता जागतिक राजकारणावर परिणाम करणारे तसेच इतर कोणतेही धोरण ठरवताना ट्रम्प यांना विरोधकांचा सामना करावा लागेल. असे असतानाच खामेनेई यांनी अमेरिका- इराण युद्धावर महत्त्वाचे भाष्य केलेय.

3 / 5

अमेरिकेने यापुढे इराणवर कोणताही हल्ला केला तर आम्ही अशा हल्ल्यांना जशास तसे उत्तर देऊ. तेहरानचे उत्तर आता सडेतोड असेल. इराण आपल्या संरक्षणाला आणखी मजबूत करत आहे, असे मोजतबा यांनी सांगितलेय.

4 / 5

डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्ष मध्यावधीच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबफ यांनीही प्रतिक्रिया दिलीय. अमेरिकेच्या लोकांनी युद्धाला नाकारलं आहे. अमेरिकेच्या या संदेशाचे आम्ही समर्थन करतो, असं गालिबफ म्हणाले आहेत.

5 / 5

दरम्यान, आता अमेरिकेतील दोन्ही काँग्रेस सदनांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे प्राबल्य निर्माण झाले आहे. पेट्रोल, डिझेलचा वाढलेला भाव, युद्ध यामुळे मतदारांनी विरोधात मतदान केले, अशी भावना व्यक्त केली जातेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us