
आपण अनेकदा घरात असताना आरसा किंवा एखादी काच अचानक फुटल्याचे पाहतो. काच फुटणे ही सामान्य बाब असली, तरी इतर वस्तूंप्रमाणे ती निष्काळजीपणामुळे ती तुटू शकते.

पण काही जुन्या समजुतीनुसार, अनेक जण काच किंवा आरसा फुटणे या घटनेला अशुभ मानतात. तसेच यामुळे वाईट बातमी मिळते, असेही बोललं जाते.

वास्तुशास्त्रानुसार काच किंवा आरसा फुटणे अशुभ नाही, तर ते शुभ मानले जाते. तुटलेली काच घरात ठेवणे निश्चितच अशुभ ठरू शकते. काच आणि आरसा फोडण्याबाबत वास्तुशास्त्रात काय म्हटले आहे ते जाणून घेऊया.

वास्तुशास्त्रानुसार, घरात पडलेली कोणतीही काचेची वस्तू किंवा आरसा काही कारणामुळे तुटला तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरावर मोठे संकट येणार होते. जे काच किंवा आरशाने स्वतःवर घेतले आहे. त्यामुळे आता तुमचा त्रास संपला. तुमचे कुटुंब सुरक्षित झाले आहे, असे म्हटले जाते.

या व्यतिरिक्त, काच अचानक फुटली तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्या घरातील एखादी जुनी समस्या आता संपली आहे.

काही जण काच फुटणे हे चांगले लक्षण मानतात. त्यामुळे काच किंवा आरसा फुटणे शुभ चिन्ह मानले जाते.

काच फुटणे हे शुभ असले तरी तुटलेली किंवा तडा गेलेली काच घरात ठेवणे वास्तुनुसार अशुभ मानले जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात नकारात्मकता पसरू लागते.

जर तुमच्या घरी अचानक काच फुटली, तर कोणताही आवाज न करता, ती तशीच घराबाहेर कचऱ्यात फेकून द्या.

पूर्वी काच अतिशय नाजूक असायच्या. सुरुवातीच्या काळात ते दूरच्या देशांमधून आयात केल्या जात असायच्या. तेव्हा ते खूप महाग असायचे. त्याच्या उपलब्धतेसाठी खूप पैसा खर्च करावा लागायचा.

तेव्हा लोक काचेची काळजी घ्यायचे. ती सांभाळून वापरायचे. यामुळे तेव्हापासून काच तुटण्याबद्दल सर्व तथ्ये धर्मांशी जोडली गेली. या तथ्यांवर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली, त्यानंतर कालांतराने हा विश्वास दृढ झाला.