Snake Fact : कोणता साप जास्त विषारी, अंडी देणारा की पिल्लांना जन्म देणारा?

सापाला जितके लोक घाबरतात तितेकच त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये कुतूहल असते. नेहमी अंडी देणारा साप विषारी की पिल्ल घालणारा साप विषारी? असा प्रश्न पडतो. चला जाणून घेऊया या विषयी सविस्तर...

| Updated on: Aug 01, 2025 | 1:26 PM
1 / 6
सापांबद्दल लोकांच्या मनात नेहमीच भीतीही असते आणि उत्सुकता असते. सापांच्या हजारो प्रजातींपैकी काही मोजक्याच विषारी असतात, तरीही त्यांच्याबद्दलच्या गैरसमजुती आणि प्रश्न कायम आहेत. एक प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो, अंडी देणारा साप जास्त धोकादायक की पिल्लांना जन्म देणारा? चला, या प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञांच्या माहितीवरून जाणून घेऊ.

2 / 6
Snake Fact : कोणता साप जास्त विषारी, अंडी देणारा की पिल्लांना जन्म देणारा?

3 / 6
कोब्रा, किंग कोब्रा, उंदीरसाप, अजगर आणि गार्टर स्नेक हे अंडी देणाऱ्या सापांमध्ये मोडतात. हे साप सुरक्षित आणि उबदार ठिकाणी एकाच वेळी अनेक अंडी घालतात. कोब्रा आणि किंग कोब्रा हे अंडी देणारे असले तरीही जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक मानले जातात.

4 / 6
वायपर, रॅटलस्नेक, गिलनॉस स्नेक आणि बोआ कन्स्ट्रिक्टर हे साप अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देतात. यामध्ये भ्रूण आईच्या शरीरात विकसित होते आणि नंतर बाहेर येते. वायपर आणि रॅटलस्नेकसारखे साप देखील अत्यंत विषारी आणि धोकादायक असतात.

5 / 6
साप तज्ज्ञांच्या मते, सापाचे विष किती धोकादायक आहे हे त्याच्या प्रजनन पद्धतीवर अवलंबून नसते, तर त्याच्या विषाची ताकद, दंश करण्याची क्षमता आणि आक्रमक स्वभाव यावर अवलंबून असते. विशेषतः बेबी कोब्रा खूप धोकादायक मानला जातो, कारण तो दंश करताना विषाचे प्रमाण नियंत्रित करू शकत नाही आणि एकाच वेळी संपूर्ण विष सोडतो, ज्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो.

6 / 6
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)