या मराठमोळ्या अभिनेत्री लग्न करणार साऊथचा सुपरस्टार धनुष? कोण आहे ती?

साऊथ सुपरस्टार धनुष लवकरच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार असल्याचे म्हटले जात आहे. ही अभिनेत्री मराठमोळी असल्याचे म्हटले जात आहे. लग्नाच्या चर्चांदरम्यान या अभिनेत्रीने प्रतिक्रिया देखील दिली आहे.

| Updated on: Jan 17, 2026 | 1:07 PM
1 / 5
दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याशी पहिले लग्न केले होते. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी वेगळे होत असल्याची घोषणा केली. आता धनुष दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. तो एका मराठमोळ्या अभिनेत्री डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्या अभिनेत्री विषयी...

2 / 5
धनुषच्या अफेअरविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. पण ही अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी मृणाल ठाकूर आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 'सन ऑफ सरदार 2' च्या प्रीमियरचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर, मृणाल ठाकूर आणि धनुष यांच्यातील नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

3 / 5
नंतर जेव्हा याबाबत विचारणा केली गेली, तेव्हा मृणालने सांगितले की धनुष फक्त तिचा 'चांगला मित्र' आहे आणि तिला फिल्मच्या स्क्रीनिंगसाठी तिच्या को-स्टार अजय देवगणने त्याला आमंत्रित केले होते. यानंतर या अफवा काही काळासाठी शांत झाल्या होत्या, पण आता पुन्हा एकदा मृणाल आणि धनुष यांच्या लग्नाच्या तारखेबाबत एक नवीन बातमी व्हायरल झाली आहे.

4 / 5
एका अहवालानुसार, मृणाल ठाकूर आणि धनुष पुढील महिन्यात 14 फेब्रुवारीला, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने लग्न करणार आहेत. अफव्यांनुसार, नवरा-नवरी यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण ही बातमी आता आगीसारखी पसरत आहे. जोपर्यंत धनुष आणि मृणालच्या लग्नाच्या फोटो समोर येत नाही तो पर्यंत या अफवा सुरुच राहणार आहेत.

5 / 5
मृणाल आणि धनुष यांनी भलेही या प्रकरणावर मौन बाळगले असले, तरी त्यांच्या नात्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. सूत्रांनी माहिती दिली की, “होय, हे खरे आहे की ते डेटिंग करत आहेत. पण हे संबंध अजून नवीन आहेत आणि ते सार्वजनिक किंवा मीडिया समोर अधिकृतपणे जाहीर करण्याची कोणतीही योजना नाहीत. तसेच, ते बाहेर फिरताना दिसतात. त्याबाबत अजिबात चिंता करत नाहीत. त्यांचे मित्र त्यांना मनापासून सपोर्ट करत आहेत कारण दोघांची व्हाइब एकमेकांशी खूप जुळते.”