Kunickaa Sadanand: 61 व्या वर्षी ‘बिग बॉस 19’ स्पर्धकाशी तिसरं लग्न करणार कुनिका? मुलाकडूनही परवागनी, कोण आहे तो?

कुनिकाने दिल्लीच्या अभय कोठारीशी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर वयाच्या 35 व्या वर्षी तिने विनय लालशी दुसरं लग्न केलं. अयान हा कुनिका आणि विनय यांचाच मुलगा आहे. 80 च्या दशकात तिचं नाव अभिनेते प्राण यांचा मुलगा सुनिल सिकंदशी आणि त्यानंतर नव्वदच्या दशकात प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्याशी जोडलं गेलं होतं.

| Updated on: Sep 12, 2025 | 11:27 AM
1 / 5
अभिनेत्री कुनिका सदानंदने 'बिग बॉस 19'मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. या सिझनमध्ये ती पहिल्या एपिसोडपासूनच सोशल मीडियावर चर्चेत आहे. शोमधील एका स्पर्धकासोबत तिची चांगली मैत्री झाली आहे. आता कुनिकाच्या मुलाने त्यांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

2 / 5
शोमध्ये कुनिकाची जवळीक ज्या स्पर्धकाशी होतेय, तो दुसरा-तिसरा कोणी नसून झीशान कादरी आहे. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत कुनिकाचा मुलगा अयानने झीशान आणि त्याच्या आईच्या मैत्रीवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

3 / 5
अयान म्हणाला, "झीशान कादरी आणि माझ्या आईमध्ये खूप चांगली मैत्री झाली आहे. झीशान भाईसुद्धा त्यांच्याकडे आकर्षित होतोय. ते मान्य करो किंवा न करो, मला त्यांच्या डोळ्यात एक चमक दिसते. जर माझ्या आईची त्या नात्याला सहमती असेल तर मला काहीच हरकत नाही."

4 / 5
"मी थेट त्यांना झीशान भाईवरून झीशान अंकल असं म्हणेन. परंतु दोघंही तापट स्वभावाचे आहेत. त्यामुळे थोडंसं सांभाळून राहावं लागेल. वीकेंड का वार एपिसोडमध्ये जेव्हा त्यांनी आईचा हात पकडला होता, तेव्हा मला खूप चांगलं वाटलं होतं", अशा शब्दांत अयानने भावना व्यक्त केल्या.

5 / 5
आई आणि झीशानच्या नात्याविषयी अयान पुढे म्हणाला, "जर मी आईला सांगितलं तर ती माझं ऐकेल. परंतु मी तिला काहीच बोलणार नाही." बिग बॉसच्या घरात एका टास्कदरम्यान कुनिकाने मस्करीत झीशानला लग्नासाठी प्रपोजसुद्धा केलं होतं.