
नवीनाने 2024 साली पती जीत करनानी पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ती 6 वर्षाच्या मुलीची आई आहे. घटस्फोटानंतर नवीन आणि जीत मुलगी किमायराचं को-पेरेंटिंग करत आहेत.

घटस्फोटानंतर नवीनाला वेगळं होण्याचं कारण विचारण्यात आलं. त्यावर तिने सांगितलं की, जेव्हा दोन लोकांमध्ये आपसात जमत नाही, तेव्हा त्यांनी वेगळं होणच चांगलं असतं.

Tally Talk सोबत बोलताना नवीन म्हणाली की, आम्ही दोघे समजदार होतो. जेव्हा लक्षात आलं की, एकत्र राहू शकत नाही. त्यावेळी वेगळे झालो. मी माझ्या आईकडे राहते. मी आणि माझा पूर्व पती आम्ही दोघे मिळून मुलीचा सांभाळ करतो.

आम्ही आमच्या मुलीसाठी हॅप्पी पॅरेंट आहोत. मी आता माझ्या आयुष्यात खूप खुश आहे. याआधी मी इतकी आनंदी कधी नव्हते.

नवीनाला जेव्हा विचारलं की, तू आता दुसरं लग्न करणार का?. त्यावर तिने सध्या मी माझ्यावर लक्ष केंद्रीत करतेय असं उत्तर दिलं. हो पण प्रेम मिळणार असेल, तर जरुर स्वागत करेन.