
ऐन लग्नाच्या हंगामातच सोन्याने मोठी उसळी घेतली आहे. सोने 1 लाखाच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. त्यामुळे वधू-वराकडील मंडळी चिंतेत सापडली आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दराने 98 हजार रुपयांचा आकडा पार केला असून सोन्याच्या दराने पुन्हा उच्चांक गाठला आहे.

सोन्याच्या दरात 700 रूपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर जीएसटीसह 98 हजार 160 रुपयांवर पोहोचले आहेत.

जळगावात सराफ बाजारात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने 98 हजार रूपयांचा आकडा पार केला आहे. जळगावात आठ दिवसात सोन्याच्या दरात 7 हजार 700 रुपयांची वाढ झाली आहे

तर चांदीच्या दरात सुद्धा वाढ झाली असून चांदीने पुन्हा 1 लाखांचा आकडा पार केला आहे.

ट्रम्प यांचं टेरीफ संदर्भातील धोरण, अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेले ट्रेड वॉर, तसेच जागतिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी या सर्व गोष्टींचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे.

सोन्याचे गगनाला भिडलेले दर त्यामुळे सोना खरेदी आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेली नाही अशा प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत