
जालन्यात बैल विकून शेतकरी लखपती झाला ,बिजल्या नावाचा बैल 11 लाख 11 हजार रुपयांना विकला गेला असून त्यामुळे शेतकऱ्याचे नशीब पालटलं आहे

कानफोडी तांडा येथील बिजल्या बैल खूप प्रसिद्ध आहे. वेगाने धावून घोड्यालाही घाम फोडणारा अशी बिजल्याची ओळख आहे. शंकर पटातला बैल असल्यानं त्याला जास्त किंमत मिळाली.

जालना जिल्ह्यातील कानफोडी तांडा येथील पवन राठोड यांचा बिजल्या नावाचा बैल तब्बल 11 लाखांना विकला आहे. सांगली जिल्ह्यातल्या कटरेवाडी येथील सागर कटरे यांनी हा बैल खरेदी केला आहे.

त्याची ताकद, त्याचा वेग यामुळे तो पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. तसेच शंकर पटातला बैल असल्यानं बिजल्याला जास्तीची किंमत मिळाली आहे. त्याला मिळालेली लाखोची किंमत सध्या गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

सकाळी 3 लिटर दूध, 100 ग्रॅम बदाम, 1 किलो उडीद डाळ, सायंकाळी रतीप खाद्य, मका भरडा, गहू भरडा असा भरभक्कम आहार बिजल्याचा असून त्याला दर 2 दिवसांनी गरम पाण्याने पाण्याने अंघोळ घालण्यात येते.