
या जगात अनेक देशांचे आपापले चलन आहे. प्रत्येक देशाचे आपापले नाणेदेखील आहे. भारताचे कोणतेही नाणे पाण्यात टाकले की ते थेट बुडते. परंतु या जगात असा एक देश आहे, ज्या देशाचे नाणे पाण्यावर ठेवले तर ते बुडत नाही. उलट ते नाणे पाण्यावर तरंगते. हे नाणे कोणते आहे? ते का तरंगते याबाबत जाणून घेऊ या... (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

हे नाणे जपान या देशाचे आहे. या नाण्याला येन असे म्हणतात. जपानचे येन हे नाणे सहजासहजी पाण्यात बुडत नाही. पाण्यावर ठेवल्यावर ते तरंगते. खूपच जोर लावल्यावर मात्र ते पाण्यात बुडते. परंतु या नाण्याच्या अशा खास गुणधर्मामुळे ते कायम चर्चेत असते. जपानमध्ये हे नाणे अजूनही चलनात आहे. ते पाण्यात न बुडण्यामागे विज्ञान आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

जपानचे 1 येन हे नाणे फक्त 0.9992 ग्रॅम एवढ्या वजनाचे असते. म्हणजे या नाण्याचे वजन एक ग्रॅमदेखील नसते. या नाण्याचा व्यास 20.00 मीमी असतो. तर जाडी 1.46 मीमी असते. हे नाणे खूपच हलके असते त्यामुळे ते पाण्यावर ठेवल्यास तरंगते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

विशेष म्हणजे हे नाणे अॅल्यूमिनिअमपासून तयार केले जाते. अॅल्यूमिनिअम हा हलका धातू असतो. 1870 च्या काळात जपानमध्ये 1 येनचे नावे तयार करताना चांदी, सोने वापरले जायचे. आता मात्र ही पद्धत बंद पडली आहे. जपानमध्ये एकूण 6 प्रकारचे वेगवेगळे नाणे चलनात आहेत.(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

यामध्ये 1 येन, पाच येन, दहा येन, 50 येन, 500 येन अशे नाणे तिथे आहेत. 1 आणि 5 येन हे नाणे तिथे वेंडिंग मशीमध्ये वापरता येत नाही. बाकी उर्वरित दैनंदिन कामासाठी या नाण्यांचा तुम्ही चलन म्हणून वापर करू शकता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)