
राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार काही दिवसांपूर्वीच लग्न बंधनात अडकले. जय यांनी ऋतुजा पाटीलशी लग्न केले आहे. त्यांच्या विवाहसोहळा हा डेस्टीनेशन वेडिंग होते. लग्नानंतर जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा 5 डिसेंबर रोजी बहरिन येथे पार पडला. या शाही विवाहसोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंबिय उपस्थित होते. मोठ्या थाटामाट्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. आता लग्नातील कधीही समोर न आलेले फोटो समोर आले आहेते.

ऋतुजा पाटील आणि जय पवार यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली आहे. लग्नातील फोटो शेअर करत जय पवार यांनी माझे लग्न माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीशी झाले आहे असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर जय पवार यांचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

बहरिनमध्ये पार पडलेल्या जय पवार यांच्या लग्न सोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित नव्हते. सुप्रिया सुळे, शरद पवार आणि प्रतिभा पवार हे गैरहजर असल्याचे पाहायला मिळाले. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या होत्या.

जय यांच्या वरातीमध्ये रेवती सुळे, युगेंद्र पवार, रोहित पवार दिसत होते. त्यांनी जय पवार यांच्या नव्या प्रवासाचा आनंद साजरा केला. सोशल मीडियावर आता या लग्न सोहळ्यातील फोटो व्हायरल झाले आहेत.

जय पवार यांच्या लग्न सोहळ्याला केवळ 400 लोकांना निमंत्रण देण्यात आले होते. जवळपास तीन दिवस 4,5 आणि 6 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम धुमधडाक्यात पार पडला. या सोहळ्याला पाटील आणि पवार कुटुंबीय हजर होते. आता जय पवार यांनी शेअर केलेले फोटो सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत.