अमिताभ आणि जया बच्चन यांच्यातलं प्रेम कसं बहरत राहिलं; टिफिन बॉक्समुळे असं फुललं नातं!

सिने जगतात अमिताभ बच्चन या नावाला फार महत्त्व आहे. आजघडीला त्यांचे देशभरात कोट्यवधी फॅन्स आहेत. असे असतानाच आता जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रेमाची गोड आठवण समोर आली आहे.

Updated on: Nov 18, 2025 | 9:53 PM
1 / 6
बॉलिवुड हे असे क्षेत्र आहे, जिथे आपला जम बसवण्यासाठी, नाव कमवण्यासाठी अनेकांची हयात जाते. यात काही कलाकार यशस्वी होतात, तर काही कलाकार मात्र शेवटच्या श्वासापर्यंत प्रसिद्धीच्या झोतात येत नाहीत. बिग बी अमिताभ बच्चन यांनी मात्र सिनेसृष्टीत आपले एक वेगळे साम्राज्य निर्माण केलेले आहे.

2 / 6
अमिताभ बच्चन यांचे आजघडीला कोट्यवधी फॅन्स आहेत. वय वाढलेले असले तरीही ते अजूनही वेगवेगळ्या चित्रपटांत काम करताना दिसतात. विशेष म्हणजे बॉलिवुडमधील त्यांचे स्थान अजूनही अढळ आहे. त्यांचा सुरुवातीचा काळ मात्र फार कठीण आणि खडतर राहिलेला आहे.

3 / 6
बॉलिवुडमध्ये आल्यानंतर अमिताभ बच्चन यांना लगेच यश मिळालेलं नाही. त्यांचे सुरुवातीला अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटलेले आहेत. त्यामुळे हा हिरो फ्लॉप ठरतो, असेच सर्वांचे मत बनले होते. त्या काळात मात्र अमिताभ बच्चन यांनी खूप मेहनत घेतली. त्या काळात ते आपल्या कुटुंबाला फारसा वेळ देऊ शकले नाहीत.

4 / 6
तरीदेखील अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांच्यातील प्रेम कायम बहरत राहिले. अमिताभ बच्चन जया बच्चन यांना वेळ देऊ शकत नसले तरीही एका खास पद्धतीने जया बच्चन यांनी त्या दोघांमधील प्रेमाचा बहर कसा कायम राहील याची काळजी घेतली.

5 / 6
त्या काळात प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे संवाद होत राहावा यासाठी जया बच्चन अमिताभ बच्चन यांच्या टिफीन बॉक्समध्ये चिठ्ठ्या लिहून पाठवायच्या. या चिठ्ठ्यांमध्ये घरात काय काय घडतंय, याची सगळी माहिती अमिताभ यांना दिली जायची.

6 / 6
कधी-कधी या चिठ्ठीमध्ये रुसवा, फुगवा असायचा. तर कधी जया बच्चन चिठ्ठीमध्ये त्यांचे पुत्र अभिषेक  बच्चन यांच्या लहानपणीच्या खोड्यांबद्दल लिहिलेलं असायचं. अशा पद्धतीने जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यातील प्रेम कायम तरुण राहिले.