अभिनेते जयवंत वाडकर झाले सासरे, थाटात पार पडला लेकीचा विवाह, काय करतो त्यांचा मल्याळी जावई ?

Jaywant Wadkar Son in Law : अभिनेते जयवंत वाडकर यांच्या मुलीचं नुकतंच लग्न पार पडलं. थाटामाटात झालेल्या या सोहळ्यााठी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यांनी जोडप्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. कोण आहेत जयवंत वाडकर यांचा जावई, काय करतो तो ?

| Updated on: May 17, 2026 | 1:15 PM
1 / 6
मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे, हिंदीतही अनेक भूमिकांत दिसणारे प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर यांच्या घरी सनईचे सूर नुकतेच घुमले. त्यांची लाडकी कन्या स्वामिनी वाडकर ही लग्नाच्या बेडीत अडकली. मोठ्या थाटामाटात जयवंत वाडकर यांच्या लेकीचा विवाहसोहळा पार पडला. वरुण नायर याच्याशी तिने लग्नगाठ बांधली. सोसल मीडियावर त्यांच्या लग्नसोहळ्य़ाचे व्हिडीओ, फोटो खूप व्हायरल झाले. (photo : Social Media)

2 / 6

वाडकर कुटुंब तसेच मित्रमंडळी आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या उपस्थितीत स्वामिनी आणि वरूण हे लग्नबंधनात अडकले. मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. अनेक सेलिब्रिटींनीही या लग्नाला उपस्थिती लावली. तसेच सोशल मीडियावरही या विवाहाचे फोटो शेअर करण्यात आले होते.

3 / 6

स्वामिनीची मैत्रीण आणि लक्ष्मीकांत-प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन स्वामिनीच्या लग्नाचे काही खास क्षण शेअर केले. लग्नासाठी स्वामिनी आणि तिच्या पतीने पारंपरिक पोशाख परिधान केला होता.

4 / 6

स्वानंदी आणि वरुण यांनी दाक्षिणात्य पद्धतीनं लग्न केलं. दक्षिण भारतीय परंपरेनुसार पार पडलेल्या या लग्नात स्वामिनीने भरजरी साडी, पारंपरिक दागिने आणि खास साऊथ इंडियन असा लूक होता.

5 / 6

अभिनेते जयवंत वाडकर हे सासरे झाले. त्यांची लेक स्वामिनी वाडकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तर जयवंत वाडकर यांचा जावई वरुण मल्याळी असून तोही कलाक्षेत्राशी संबंधित आहे. वरुण हा प्रसिद्ध निर्माता आहे. मिरारी प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेचा तो संस्थापक आहे. वरूण आणि स्वामिनी यांचं लव्ह मॅरेज आहे.

6 / 6

स्वामिनी आणि वरुण यांनी जिओस्टारच्या 'एन्गेज 2' या शोसाठी एकत्र काम केलं होतं. तसेच वरुणने प्लॅनेट मराठीवरील 'बाबा' या सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमात जयवंत वाडकर आणि स्वामिनी या बाप-लेकीची जोडी दिसली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us