Jio : जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर! आता इंटरनेटचा महागडा रिचार्ज नको, जिओने आणले स्वस्त रिचार्ज प्लॅन, किंमत फक्त 147 रुपयांपासून

घरात वायफाय असल्यामुळे मोबाईल डेटाची गरज नसलेले, ज्येष्ठ नागरिक किंवा केवळ कॉलिंगसाठी सिम वापरणारे ग्राहकांसाठी जिओचा हा प्लॅन एकदम बेस्ट आहे.

| Updated on: Nov 12, 2026 | 4:53 PM
1 / 5
मोबाईलमध्ये इंटरनेट वापरत नाही, पण केवळ काँलिंगसाठी दर महिन्याला महगडा रिचार्ज करावा लागतोय? मग जिओने आणलेले  व्हॉईस ओन्ली प्लॅन तुमच्या कामाचे ठरू शकतात. घरात वायफाय असल्यामुळे मोबाईल डेटाची गरज नसलेले, ज्येष्ठ नागरिक किंवा केवळ कॉलिंगसाठी सिम वापरणारे ग्राहक अशा प्लॅनचा फायदा घेऊ शकतात.

2 / 5

जिओच्या कमी किमतीच्या प्लॅनची सुरूवात 147 रूपयांपासून होते. या रिचार्जमध्ये 22 दिवसांची वैधता, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 300 MMS मिळतात. 196 रूपयांच्या रिचार्जमध्ये 30 दिवसांची वैधता आणि हेच कॉलिंग व MMS मिळतात.

3 / 5

ज्यांना वारंवार रिचार्ज करण्याची कटकट नको आहे.त्यांच्यासाठी जिओने दीर्घ वैधतेचे दोन पर्यायही ठेवले आहेत. 448 रूपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता, अमर्यादित कॉलिंग आणि एकूण 1000 MMS मिळतात. याशिवाय जिओ टिव्ही आणि जिओ एआय क्लाउडची सुविधाही दिली जाते

4 / 5

तर 1,748 रूपयांच्या प्लॅनमध्ये तब्बल 336 दिवसांची वैधताही मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि 3,600 MMSचा समावेश आहे. या प्लॅनसोबतही जिओ टीव्ही, जिओ AI क्लाउडचे फायदे दिले जातात. त्यामुळे जवळपास वर्षभर सिम सुरू ठेवायचं असेल, तर हा पर्याय योग्य आहे.

5 / 5

या व्हॉईस ओन्ली प्लॅनमध्ये मोबाईल इंटरनेट डेटा मिळत नाही. त्यामुळे कधी इंटरनेटची गरज पडली,तर ग्राहकांना स्वतंत्र डेटा व्हाऊचर घ्यावा लागेल. हे प्लॅन जिओच्या MYJIO अॅप आणि वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us