Jio Recharge : जिओच्या 52 कोटी ग्राहकांची बल्ले-बल्ले, 98 दिवसांची चिंता मिटली

Jio 999 Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून, तिचे 52 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये असा एक प्लॅनही आहे, जो जवळपास 100 दिवस रिचार्जची चिंता दूर करतो.

| Updated on: Jul 03, 2026 | 5:16 PM
1 / 5
मोबाइल वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन जिओने दीर्घ वैधतेच्या प्लॅन्सची संख्या वाढवली आहे. कंपनीकडे आता 56 दिवस, 84 दिवस, 90 दिवस, 98 दिवस, 200 दिवस, 336 दिवस आणि 365 दिवसांच्या वैधतेचे अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत.

2 / 5
तुम्हाला 200, 336 किंवा 365 दिवसांचा प्लॅन घ्यायचा नसेल, तर जिओचा 999 रुपयांचा प्लॅन हा किफायतशीर पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमध्ये 98 दिवसांची वैधता मिळते. त्यामुळे एकदाच रिचार्ज करून जवळपास 100 दिवस पुन्हा रिचार्ज करण्याची गरज राहत नाही.

3 / 5
या प्रीपेड प्लॅनमध्ये 98 दिवसांसाठी सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. ग्राहकांना लोकल आणि एसटीडी कॉल्स विनामूल्य करता येतात. याशिवाय दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतात.

4 / 5
डेटाच्या बाबतीतही हा प्लॅन आकर्षक आहे. यात एकूण 196GB हाय-स्पीड डेटा मिळतो, म्हणजेच ग्राहक दररोज 2GB डेटा वापरू शकतात. या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी Jio Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. तसेच 50GB AI Cloud Storage ची सुविधाही दिली जाते.

5 / 5
याशिवाय या प्लॅनसोबत 18 महिन्यांसाठी Google Gemini Pro चे सब्सक्रिप्शन मोफत दिले जाते. स्वतंत्रपणे हे सब्सक्रिप्शन घेतल्यास त्यासाठी सुमारे 35,100 रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे AI फीचर्सचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन विशेष आकर्षक मानला जात आहे.

Follow Us