‘छावा’ सारख्या सिनेमात कधीही काम करणार नाही; जॉन अब्राहमचं खळबळजनक वक्तव्य, असं का म्हणाला?

सध्या जॉनचा 'तेहरान' हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमेच्या प्रमोशनदरम्यान त्याने केलेले वक्तव्य चर्चेत आहे. त्याला ‘छावा’ आणि ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटांबाबत विचारले असता त्याने स्पष्ट भूमिका मांडली आहे. आता जॉन नेमकं काय म्हणाला जाणून घ्या...

| Updated on: Aug 14, 2025 | 12:16 PM
1 / 7
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम कायमच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. कधी त्याच्या सिनेमांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या जॉन त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. त्याने ‘छावा’ आणि ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटांबाबत केलेल्या एका वक्तव्यमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. जॉनने ठामपणे सांगितलं की, तो अशा प्रकारच्या चित्रपटांपासून अंतर राखणार आहे आणि भविष्यात अशा प्रोजेक्ट्समध्ये सहभागी होणार नाही. आता तो नेमकं काय म्हणाला चला जाणून घेऊया...

2 / 7
जॉन अब्राहमच्या ‘तेहरान’ या नव्या चित्रपटात दिसणार आहे, जो २०१२ मध्ये इस्रायली राजदूतांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. एका मुलाखतीदरम्यान जॉनला ‘छावा’ किंवा ‘द कश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत विचारणा झाली. त्यावर त्याने आपलं मत मोकळेपणाने मांडलं.

3 / 7
‘छावा’ सिनेमा मी पाहिला नाही, पण लोकांना तो आवडल्याचं ऐकलं आहे. ‘द कश्मीर फाइल्स’लाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पण मला अशा चित्रपटांबाबत अस्वस्थ वाटतं,” असं जॉन म्हणाला.

4 / 7
जॉन पुढे म्हणाला, “जेव्हा एखादा चित्रपट विशिष्ट राजकीय हेतूने बनवला जातो आणि तो प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरला जातो, तेव्हा मला त्याची चिंता वाटते. मला अशा चित्रपटांचा कधीच मोह झाला नाही आणि मी भविष्यातही अशा चित्रपटांपासून दूर राहीन. कधीही काम करणार नाही”

5 / 7
आपल्या चित्रपट निवडीबाबत जॉनने सांगितलं की, तो नेहमीच आपल्या चित्रपटांद्वारे दाखवल्या जाणाऱ्या संदेशाबाबत सजग असतो. “मी माझ्या चित्रपटांद्वारे खरेपणा आणि सत्य दाखवण्यावर विश्वास ठेवतो. व्यावसायिक यशापेक्षा सत्याला प्राधान्य देणं मला महत्त्वाचं वाटतं,” असं त्याने स्पष्ट केलं.

6 / 7
राजकारणाबाबत बोलताना जॉन म्हणाला, “मी कोणत्याही राजकीय विचारसरणीशी जोडलेला नाही. माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही.” तसंच, सेन्सॉरशिपच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, असंही त्याने नमूद केलं. “मी माझ्या चित्रपटांबाबत नेहमीच जबाबदारीने वागतो,” असं जॉनने ठामपणे सांगितलं.

7 / 7
जॉनच्या या वक्तव्यमुळे बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. त्याच्या या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक होत आहे, तर काही जण त्याच्या या मतांवरून वाद निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करत आहेत.