
अभिनेत्री विद्या बालन हिने 'द डर्टी पिक्चर' (२०११) आणि 'कहानी' (२०१२) या चित्रपटांद्वारे बॉलीवूडवर डंका वाजवला आहे. साऊथची सी ग्रेट अभिनेत्री सिल्क स्मिता हीच्या आयुष्यावरील हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या देखील यशस्वी ठरला होता.

अभिनेत्री तापसी पन्नू हीने आपल्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनी महिला केंद्रीत चित्रपटांना मार्केट मिळवून दिले. तापसी हिने 'नाम शबाना' (२०१७), 'सांड की आंख' (२०१९) आणि 'थप्पड' (२०२०) या चित्रपटांद्वारे स्वतःचा वेगळा प्रेक्षक निर्माण केला.

अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या 'राजी' (२०१८) आणि 'गंगूबाई काठियावाडी' (२०२२) या चित्रपटांनी महिला-प्रधान ब्लॉकबस्टर चित्रपटांचा मार्ग आणखी मजबूत केला.विद्या, राणी, तापसी आणि आलिया - या अभिनेत्रींनी दाखवून दिले आहे की चांगला अभिनय आणि ताकदवान कथा प्रेक्षकांना भावत मग ती भूमिका स्रीने केलेली असो वा पुरुषाने असे चित्रपट चालतातच.

राणी मुखर्जी हिने 'मर्दानी' (२०१४) आणि 'हिचकी' (२०१८) या चित्रपटात आपली वेगळी छाप निर्माण करण्याच यश मिळवले. राणीच्या चित्रपटांना मात्र जास्त पैसा मिळवून दिला नसला तरी थिएटरमध्ये प्रेक्षकांना काही प्रमाणात यश मिळविले.