आजकाल लग्नात वाजणारं हे सुपरहिट गाणं अंतिम यात्रेसाठी बनवलं होतं; वडिलांच्या निधनानंतर लेखकाला सुचलं…
कैलाश खेर यांचे ‘आज मेरे पिया घर आवेंगे’ हे गाणे आज लग्नसोहळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळते. मात्र, या गाण्यामागची कथा प्रेमापेक्षा आध्यात्मिक आणि भावनिक आहे. वडिलांच्या निधनानंतर कैलाश खेर यांना या गाण्याची प्रेरणा मिळाली होती.

लग्नात वाजणाऱ्या गाण्याचा वेगळा अर्थ ‘आज मेरे पिया घर आवेंगे’ हे गाणे लग्नातील वधूच्या प्रवेशासाठी वाजवले जाते. मात्र, या गाण्यात आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाचा भाव आहे.
गाण्याच्या ओळींचा आध्यात्मिक अर्थ ‘हे री सखी मंगल गाओ री, धरती अंबर सजाओ री, आज उतरेगी पी की सवारी’ या ओळी आत्म्याच्या परमात्म्याशी भेटीचा संदर्भ देतात. त्यामुळे हे केवळ प्रेमगीत नाही.
वडिलांच्या निधनातून मिळाली प्रेरणा कैलाश खेर यांनी सांगितले होते की 21 नोव्हेंबरला त्यांचे वडील ईश्वराचे भजन म्हणत होते. त्यानंतर त्यांनी प्राण सोडले आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती.
वडिलांची आठवण गाण्यात जपली वडिलांच्या निधनानंतर कैलाश खेर भावनिकदृष्ट्या खचले होते. त्यांच्या वडिलांनीच त्यांना संगीताची ओळख करून दिली होती.
निधनाच्या दिवशीही केली परफॉर्मन्स वडिलांच्या निधनाच्या दिवशी कैलाश खेर यांनी स्टेजवर लाइव्ह परफॉर्मन्स दिला. पुढे याच अनुभवातून आत्मा आणि परमात्म्याच्या नात्यावर हे गाणे साकारले. ‘आज मेरे पिया घर आवेंगे’ हे गाणे वरवर प्रेमगीत वाटत असले तरी त्यामागे आत्मा, परमात्मा आणि मृत्यूचा आध्यात्मिक संदर्भ आहे. वडिलांच्या निधनाने कैलाश खेर यांच्या मनावर झालेला परिणाम या गाण्याच्या निर्मितीमागे महत्त्वाचा ठरला.