Kajal Aggarwal: न विचारता गाडीत घुसला, शर्ट काढला अन्… काजल अग्रवाल थरथर कापू लागली, नेमकं काय घडलं?

Kajal Aggarwal: बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने एका मुलाखतीमध्ये भयानक अनुभव सांगितला आहे. तो अनुभव ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. आता काजल नेमकं काय म्हणाली वाचा...

| Updated on: Jul 29, 2026 | 3:06 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री या त्यांच्या ग्लॅमरस लूकने कायमच चाहत्यांना घायाळ करतात. त्यांच्या प्रत्येक लूकवर चाहत्यांचे लक्ष आहे. लग्झरी आयुष्य आणि लूकसोबतच अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. नुकताच प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. सिनेमाचे शूट सुरु असताना सहाय्यक दिग्दर्शक अचानक तिच्या व्हॅनिटीमध्ये शिरला. त्याने केलेल्या कृत्याने ती थरथर कापू लागली होती.

2 / 5
काजल अग्रवाल, रणबीर कपूरच्या रामायणात मंथराच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तिने हा किस्सा सांगितला. तो ऐकून सर्वजण चकीत झाले आहेत. आपल्या चित्रपट कारकिर्दीत काजल अग्रवाल अनेक लोकांना भेटली, पण तिची प्रत्येक भेट चांगलीच होती असे नाही. काजलने असिस्टंट डायरेक्टरबाबत असा किस्सा एक सांगितला आहे, जो ऐकून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे.

3 / 5
काजल अग्रवालने चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या एका भयावह घटनेची आठवण सांगितली आहे. तिने सांगितले की एका असिस्टंट डायरेक्टरने बिना परवानगी किंवा दार ठोठावल्याशिवाय तिच्या कारवाँमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने अचानक शर्ट काढला आणि छातीवर बनवलेले काजलचे नाव असलेला टॅटू दाखवला आहे.

4 / 5
काजलने एका मुलाखतीत सांगितले की, “काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर मी माझ्या कारवाँमध्ये आराम करत होते. तेव्हा चित्रपटात काम करणारा एक असिस्टंट डायरेक्टर बिना परवानगी अचानक माझ्या कारवाँमध्ये आला. त्याने लगेच आपला शर्ट काढला आणि छातीवर माझे नाव असलेला टॅटू दाखवला. ही घटना इतकी धक्कादायक होती की माझे हात-पाय कापू लागले.”

5 / 5
काजलने मान्य केले की त्या असिस्टंट डायरेक्टरने त्यांच्या नावाचा टॅटू बनवून त्यांच्याबद्दलची दीवानगी दाखवली होती, पण त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्याचे वर्तन पूर्णपणे चुकीचे होते. ती म्हणाली, “मला चांगले वाटले की त्याने माझ्या नावाचे टॅटू बनवला होता, पण एकटी असताना बिना परवानगी आत येणे पूर्णपणे चुकीचे होते. कोणी कितीही मोठा फॅन असला तरी असे वर्तन स्वीकारता येणार नाही. मी त्याला इशारा दिला की असे करणे कायदेशीर कारवाईपर्यंत नेऊ शकते आणि नंतर त्याला तिथून पाठवून दिले.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us