4 दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटला! मराठी तरुणीला बेदम मारणारा गोकुळ झा कोण? कारनाम्यांची कुंडली आली समोर

कल्याण येथील मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झा या आरोपीची कुंडली आता समोर आली आहे.

| Updated on: Jul 23, 2025 | 12:17 PM
1 / 6
कल्याणमधील एका रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ काल सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यानंतर या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. आता ही मारहाण करणाऱ्या परप्रांतीय गोकुळ झाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

2 / 6
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अविनाश जाधव यांच्या आदेशावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या गोकुळ झा याला शोधायला सुरुवात केली होती. ही शोधमोहीम सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांनी मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी पोलिसांच्या आधी गोकुळ झा या शोधून काढले. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आता या परप्रांतीय गोकुळ झाच्या काळया कारनाम्यांची कुंडलीच बाहेर आली आहे.

3 / 6
मराठी तरुणीला बेदम मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या नावावर कल्याण, कोळशेवाडी, उल्हासनगर या परिसरात दरोड्यासह मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.

4 / 6
गोकुळ झा हा चार दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटला होता. गोकुळवर याआधी दोन गुन्हे दाखल आहेत. गोकुळ झा कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरामध्ये फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली करत असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे.

5 / 6
हत्यार बाळगणे आणि मारहाण करणे, असे २ गंभीर गुन्हे दाखल आहेत. एक गुन्हा विठ्ठलवाडी आणि एक गुन्हा कोसळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका गुन्ह्यांत त्याने हत्याराने मारहाण केली होती तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याने ट्रक चालकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये सदरील ट्रक चालकाने मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

6 / 6
या प्रकरणात गोकुळला अटक झाली होती. चार दिवसांपूर्वीच गोकुळ हा जामिनावर सुटून बाहेर आला होता. आता त्याने केलेल्या मारहाणीनंतर पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतलं आहे.