‘कमळी’- ‘तारिणी’चा महासंगम; थरारक एपिसोडचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

कमळी ही मालिका रात्री 9 वाजता आणि तारिणी ही मालिका 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या दोन्ही मालिकांच्या महासंगम एपिसोडमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच रंजक घडामोडी पहायला मिळणार आहेत.

| Updated on: Nov 16, 2025 | 4:27 PM
1 / 5
झी मराठी वाहिनीवरील दोन दमदार व्यक्तिमत्व.. तारिणी आणि कमळी या थरारक महासंगम एपिसोडमध्ये एकत्र आल्या आहेत. या भागात धैर्य, गूढ, साज आणि शक्तीचा संगम घडणार आहे. या भागात कौशिकी यांच्या आयुष्याला गंभीर धोका निर्माण होणार आहे.

2 / 5
युवराज आणि कामिनी यांनी सत्काराच्या हारात  बॉम्ब लावून तिची हत्या करण्याचा कट रचला आहे. कमळीला त्या हारात काहीतरी संशयास्पद वाटतं आणि ती तात्काळ तारिणीला या धोक्याबद्दल सावधान करते. त्यानंतक दोघी मिळून लोकांना शांत ठेवत, बॉम्बचं मेकॅनिझम समजून घेत, बॉम्ब निष्क्रिय करण्याच्या तयारीत आहेत. प्रेक्षकांसाठी हा क्षण थरारक अनुभव असणार आहे.

3 / 5
या धाडसी कृतीदरम्यान, कमळीला तारिणीची खरी ओळख उघड होणार आहे की, ती एक अंडरकव्हर कॉप (पोली,) आहे, जी युवराज आणि कामिनी यांच्या गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी  काम करत होती. कमळीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री विजया बाबरने टीम तारिणीसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

4 / 5
"तारिणीच्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप खास होता. शिवानी सोनार (तारिणी) हिच्यासोबत मागील शोमधली ओळख होती आणि पुन्हा तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव खरंच कमाल होता. माझा एक डान्स परफॉर्मन्सही या महासंगम एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे," असं ती म्हणाली.

5 / 5
"तो परफॉर्मन्स मी फक्त एक तासात शिकले आणि शूट केला. मी पहिल्यांदाच सरावाशिवाय इतक्या कमी वेळात डान्स शिकले आणि परफॉर्मन्स केला. याचं क्रेडिट माझ्या कोरिओग्राफरलाही जातं, तिच्यामुळे हे शक्य झालं. तारिणी  माझ्यासाठी नवीन शैलीची मालिका आहे आणि त्याच्यासाठी शूट करण्याचा अनुभव देखील खूप वेगळा होता," अशा शब्दांत ती व्यक्त झाली.