तुझी गावठी मराठी नकोय..; सेटवर 150-200 लोकांसमोर मराठी अभिनेत्रीचा अपमान

'कमळी' या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री सुषमा मुरूडकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सेटवरील तिचा सर्वांत अपमानास्पद अनुभव सांगितला. सेटवर 200 लोकांसमोर दिग्दर्शकाने तिचा अपमान केला होता.

| Updated on: Jun 08, 2026 | 3:15 PM
1 / 5
'कमळी' या मालिकेत रागिणी महाजनची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुषमा मुरुडकर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिंदी मालिकेत काम करताना आलेल्या अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. 'कुंडली भाग्य' या लोकप्रिय हिंदी मालिकेत काम करताना तिला सेटवर 150-200 लोकांसमोर भाषेमुळे अपमान सहन करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने हा प्रसंग सांगितलं.

'कमळी' या मालिकेत रागिणी महाजनची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुषमा मुरुडकर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिंदी मालिकेत काम करताना आलेल्या अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. 'कुंडली भाग्य' या लोकप्रिय हिंदी मालिकेत काम करताना तिला सेटवर 150-200 लोकांसमोर भाषेमुळे अपमान सहन करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने हा प्रसंग सांगितलं.

2 / 5

'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत सुषमा म्हणाली, "कुंडली भाग्य या मालिकेत काम करताना हिंदी भाषेत संवाद बोलताना माझ्याकडून थोडी गडबड व्हायची. एकदा दिग्दर्शकाने मला सेटवर सर्वांसमोर झापलं की, आपकी गावठी मराठी नहीं चाहिए, हिंदी प्रॉपर बोलो (तुझी गावठी मराठी नकोय, नीट हिंदी बोल). त्यावेळी सेटवर जवळपास 150 ते 200 लोकं होती."

3 / 5

"मी इतका अपमान सहन केला आहे. त्यांना फक्त ओके बोलून मी पुढचा शॉट दिला आणि तो परफेक्ट झाला. कधीकधी फ्लो मध्ये बोलताना हिंदीचा उच्चार चुकतो किंवा टोन चुकीचा वाटतो. काही वर्षे हिंदी काम करून सरावाने मी उत्तम बोलू लागले होते, पण जेव्हा मराठी मालिकेत भूमिका मिळाली, तेव्हा मराठीत गडबड होऊ लागली", असं तिने पुढे सांगितलं.

4 / 5

मराठी मालिकेत काम करताना 'तुला स्पष्ट मराठी बोलता येत नाही', असं एकाने म्हटल्याचा खुलासा सुषमाने केला. मात्र निर्माते चांगले असल्यामुळे त्यांनी दिलेल्या टिप्समुळे आणि सरावाने सुषमाने तिच्यात सुधारणा केल्या. जेव्हा आत्मविश्वास किंवा मनोबल कमी होतं, तेव्हा मी स्वत:लाच 'बेस्ट' म्हणते आणि काम करते, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

5 / 5

सुषमा मुरूडकरने 'लग्नाची बेडी' या मालिकेतही काम केलंय. तर हिंदीत 'कुंडली भाग्य' या मालिकेत तिने भूमिका साकारली होती. आता ती 'कमळी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. उच्चार सुधारावेत यासाठी तिने तोंडात पेन्सिल ठेवून बोलण्याचा सराव केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us