
कंगना रणौतचा तेजस सिनेमा प्रदर्शित होणारे. या चित्रपटाचं प्रमोशन जोरात सुरु आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना गुजरातला सुद्धा गेली होती, सध्या ती या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. "तेजस" चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी देशाचे संरक्षणमंत्री आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसाठी या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आलंय.

या स्पेशल स्क्रीनिंगनंतर कंगना रणौतने तिच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत. फोटोंसोबतच तिने तिचा अनुभव शेअर केलाय. या फोटोमध्ये कंगनाने ऑफ व्हाईट रंगाची फ्लोरल प्रिंट साडी नेसलीये. या फोटोमध्ये कंगना खूप सुंदर दिसतीये.

तेजस हा चित्रपट भारतीय सैनिक आणि संरक्षण दलाशी संबंधित आहे. या चित्रपटाच्या टीमने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसाठी स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं.

हे फोटो शेअर करताना कंगनाने एक नोट लिहिलीये, "हा चित्रपट संरक्षण दल आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणं हा एक रोमांचक अनुभव होता" असं तिने म्हटलंय.

या नोटमध्ये पुढे तिने लिहिलं "जनरल अनिल चौहान PVSM, UYSM, AVSM, SM, VSM यांनी "तेजस" चित्रपट पाहिल्यावर त्यांच्या जॅकेटमधून लढाऊ जेटच्या आकाराचा ब्रोच काढला आणि आमचे दिग्दर्शक सर्वेश मेवाडा यांना भेट म्हणून दिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर सगळे खूप आनंदी दिसत होते.