8.8 IMDb रेटिंग, हिरोइनच ठरते विलेन; सत्य समोर येताच बदलते संपूर्ण कथा

या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली असून थिएटरमध्ये त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. आयएमडीबीवर या चित्रपटाला 8.8 रेटिंग मिळाली आहे. हिरोइनच यामध्ये विलेन ठरते आणि त्यानंतर कथेत जो ट्विस्ट येतो, तो शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवतो.

| Updated on: Oct 12, 2025 | 10:11 AM
1 / 5
2022 मध्ये प्रदर्शित झालेला 'कांतारा' हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. त्याच्या तीन वर्षांनंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'कांतारा : चाप्टर 1' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. अवघ्या 8 दिवसांत या चित्रपटाने 400 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

2 / 5
ऋषभ शेट्टी लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत 'कांतारा: चाप्टर 1'वर प्रेक्षक भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या चित्रपटाने एका ट्विस्टने प्रेक्षकांचं डोकं चक्रावलं आहे. यामध्ये खलनायक नसून खलनायिका आहे आणि अभिनेत्री रुक्मिणी वसंतने ती भूमिका साकारली आहे. तिच्या भूमिकेचं सत्य समोर आल्यानंतर चित्रपटाची संपूर्ण कथाच बदलून जाते.

3 / 5
सुरुवातीला प्रेक्षकांना वाटू लागतं की रुक्मिणी वसंत 'कांतारा'मधील लोकांची मदत करतेय. परंतु अचानक जेव्हा तिचं खरं रुप समोर येतं, तेव्हा सर्वजण थक्क होतात. या चित्रपटाचा क्लायमॅक्स आणखी दमदार असून अंगावर अक्षरश: काटा येतो.

4 / 5
शेवटची 40 मिनिटं तुम्ही खुर्चीला खिळून बसता. ऋषभ शेट्टीचं जबरदस्त अभिनय, दिग्दर्शन यांची झलक त्यात पहायला मिळते. IMDb वर या चित्रपटाला 10 पैकी 8.8 रेटिंग मिळाली आहे. यावरून हे स्पष्ट होतंय की प्रेक्षकांना हा चित्रपट खूपच आवडला आहे.

5 / 5
 होम्बाले फिल्म्स बॅनरअंतर्गत बनलेल्या या चित्रपटात ऋषभ शेट्टी, रुक्मिणी वसंत यांच्यासोबत जयराम आणि गुलशन देवैया यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'कांतारा'चा हा प्रीक्वेल असून 2 ऑक्टोबर रोजी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा सध्या कन्नडमधील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.