पूर्व पती संजय कपूरसाठी करिश्मा भावूक, निधनाच्या 1 वर्षांनंतर असं म्हणाली तरी काय?
अभिनेत्री करिश्मा कपूर हिने उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी संजय कपूर याचं निधन झालं. आता पूर्व पतीच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर करिश्मा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती संजय कपूर याच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. अशात पहिल्या पुण्यतिथीनिमित्त करिश्मा हिने भावूक होऊन संजय यची आठवण काढली आणि एक भावूक पोस्ट शेअर केली. करिश्मा हिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

करिश्मा हिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री पूर्व पतीच्या आठवणीत म्हणाली, '12-6-2025 संजय कायम आमच्या आठवणीत राहतील...', सध्या करिश्मा हिने केलेली पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

करिश्मा कपूर हिचा पूर्व पती आणि उद्योगपती संजय कपूर याचे वयाच्या 53 व्या वर्षी काल लंडनमध्ये निधन झालं. संजय कपूर याच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. करिश्मा देखील तिच्या दोन मुलांसोबत संजय यांच्या अंत्यदर्शनासाठी दिल्ली येथे पोहोचली होती.

रिपोर्टनुसार, संजयच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, संजय कपूर गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळत असताना अचानक त्याला गुदमरल्यासारखे वाटले. त्याने खेळ थांबवण्याची विनंती केली आणि नंतर तो मैदानाबाहेर गेला. रिपोर्टनुसार, संजय कपूरने मधमाशी गिळली होती आणि त्याच्या घशात दंश झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका आला.

करिश्मा कपूरने तिची आई बबिता कपूरच्या सांगण्यावरून संजय कपूरशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं देखील आहे. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. करिश्मा कपूरशीघटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षांनी संजय कपूरने मॉडेल आणि उद्योजिका प्रिया सचदेवशी लग्न केले. दोघांना एक मुलगा आहे.