
अभिनेत्री करिश्मा कपूर बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. पण, असं असलं तरी तिचे सुपरहिट चित्रपट अजूनही चाहते विसरलेले नाहीत. एका काळी काय तिचा स्टारडम होता. काय तिची चर्चा होती. 90 च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असणारी करिश्म आणि तिचे टॉप-5 सुपरहिट चित्रपटाविषयी जाणून घेऊया. कारण, कमाई फार केली नाही, तरी देखील हे पाच देखील चित्रपट सुपरहिट ठरले होते. त्यावेळी अनेकांना हाच प्रश्न पडायचा, असं कसं शक्य आहे. चला तर मग याविषयी जाणून घेऊया.

करीना कपूर खानने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे सिनेमे दिले आहेत. तर तिची मोठी बहीण करिश्मा कपूरनेही बॉलिवूडमधील सुपरहिट वर सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आता ती चित्रपटांमध्ये दिसत नाही, पण तिच्या काळात तिने बॉक्स ऑफिसवर राज्य केले. चला आज जाणून घेऊया करिश्माच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-5 चित्रपटांबद्दल. हे सर्व सुपरहिट ठरले. मात्र, तिकीट खिडकीवर एकालाही 50 कोटींपेक्षा जास्त कमाई करता आली नाही.

करिश्मा कपूरच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट म्हणजे 'राजा हिंदुस्तानी'. 1996 च्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. 1996 मध्ये आलेल्या या चित्रपटात आमिर खानने करिश्मासोबत काम केले होते. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 43.2 कोटी रुपयांची कमाई केली होती.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल तो पागल'चा समावेश आहे. या चित्रपटात करिश्मासोबत माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान देखील होते. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 34.89 कोटी रुपयांची कमाई केली.

'बीवी नंबर 1' हा करिश्माच्या कारकिर्दीतील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात सलमान खान, सुष्मिता सेन, सैफ अली खान, अनिल कपूर आणि तब्बू यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाने भारतात 25.55 कोटी रुपयांची कमाई केली.

24 मार्च 2000 रोजी प्रदर्शित झालेला 'दुल्हन हम ले जाएंगे' या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 18 कोटींहून अधिक कमाई केली. तर वर्ल्डवाइडने 36 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.

'हिरो नंबर वन'मध्ये करिश्मा कपूरने सुपरस्टार गोविंदासोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात या दोघांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. कमाईबद्दल बोलायचे झाले तर गोविंदा आणि करिश्माच्या चित्रपटाने 17 कोटींची कमाई केली.